घरदेश-विदेशस्कूलबस चालकाचा तीन वर्षाच्या चिमुकलीवर बलात्कार

स्कूलबस चालकाचा तीन वर्षाच्या चिमुकलीवर बलात्कार

Subscribe

दिल्लीमध्ये एका स्कूलबस चालकांने तीन वर्षाच्या चिमुरडीवर बलात्कार केल्याची संतापजनक घटना घडली आहे.

उत्तर प्रदेशमध्ये एका स्कूलबस चालकाने तीन वर्षाच्या चिमुरडीवर बलात्कार केल्याची संतापजनक घटना घडल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून घटनेनंतर आरोपी पसार झाला आहे. पोलीस त्याचा कसून शोध घेत आहेत.

नेमके काय घडले?

उत्तर प्रदेशमधील ग्रेटर नोएडात एका साडेतीन वर्षाच्या चिमुरडीवर स्कूलबस चालकाने बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. एका खासगी शाळेतील नर्सरीत ही चिमुरडी शिकत आहे. या चिमुरडीला शाळेत घेऊन जाण्यासाठी आणि येण्यासाठी स्कूलबस लावण्यात आली आहे. ही चिमुरडी घरी येत असताना स्कूलबसमध्ये कोणीही नसल्याची संधी साधत या बस चालकांने त्या चिमुरडीवर बलात्कार केला. ही मुलगी प्रचंड घाबरली होती. तसेच तु याबाबत कोणाला सांगितल तर तुला मारणार अशी धमकी देखील त्यावेळी त्याने तिला दिली.

- Advertisement -

यामुळे कळले सत्य

स्कूलबसमधून चिमुरडी बाहेर आल्यानंतर तिने वडिलांना पाहिल्यांनंतर तिला रडू आले. चिमुरडीला काय झाले असे वडिलांनी विचारले असता या मुलींने स्कूलबसच्या भैयाने माझे कपडे काढल्याचे सांगितले. हे ऐकताच वडिलांना धक्काच बसला. हा घडलेला सर्वप्रकरा त्यांनी घरी गेल्यानंतर पत्नीला सांगितला. हे ऐकल्यानंतर पत्नीने आपल्या मुलीला पुन्हा विचारणा करुन तिचे सर्व म्हणणे रेकॉर्डिंग करुन पोलीस ठाण्यात धाव घेतली. तसेच चिमुरडीच्या आईवडिलांनी या घटनेची माहिती शाळा प्रशासनाला दिली. प्रशासनाने देखील कठोर कारवाईचे आश्वासन दिले. मात्र त्यावर कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही. मात्र पोलिसांनी स्कूलबस चालकाविरोधात बलात्कार बसेच लहान मुलांवरील लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. परंतु बसचालक अद्याप फरार असून पोलीस स्कूलबस चालकाचा शोध घेत असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -