घर क्राइम ठग सुकेश चंद्रशेखर उभारणार जॅकलीनसाठी महागडे रुग्णालय; कुत्र्या, मांजरावर होणार फुकटात उपचार

ठग सुकेश चंद्रशेखर उभारणार जॅकलीनसाठी महागडे रुग्णालय; कुत्र्या, मांजरावर होणार फुकटात उपचार

Subscribe

फसवणूक करणारा सुकेश चंद्रशेखर याने बॉलिवूड अभिनेत्री जॅकलीन फर्नांडिसला पत्र लिहिले आहे. सुकेश जॅकलिनचे स्वप्न पूर्ण करणार आहे.

नवी दिल्ली : फसवणूक करणारा ठग सुकेश चंद्रशेखर याने बॉलिवूड अभिनेत्री जॅकलीन फर्नांडिसला पुन्हा एकदा प्रेमपत्र लिहिले आहे. या पत्रात सुकेशने जॅकलिनचे स्वप्न पूर्ण करण्याबाबत सांगितले आहे. तिच्यासाठी तो चक्क आंतरराष्ट्रीय दर्जाचे हॉस्पिटल बांधून देणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे. तेव्हा पुन्हा एकदा अभिनेत्री जॅकलीन फर्नाडीस चर्चेत आली असून, हिंदी चित्रपटसृष्टीत याप्रकरणी वेगवेगळ्या चर्चांना उधाण आले आहे.(Thug Sukesh Chandrasekhar to set up expensive hospital for Jacqueline; Free treatment for dogs and cats)

फसवणूक करणारा सुकेश चंद्रशेखर याने बॉलिवूड अभिनेत्री जॅकलीन फर्नांडिसला पत्र लिहिले आहे. सुकेश जॅकलिनचे स्वप्न पूर्ण करणार आहे. त्यांने आपल्या पत्रात दावा केला आहे की तो, बंगळुरूमध्ये कुत्रे, मांजर आणि घोड्यांसाठी आंतरराष्ट्रीय स्तरावरील सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल उभारणार आहेत. हे रुग्णालय 25 हजार स्क्वेअर फूटमध्ये पसरले असून त्याचे बजेट 25 कोटी रुपये असल्याचे सांगण्यात आले आहे. हे सर्व तो फक्त जॅकलिन फर्नांडिससाठी करणार असल्याचे सुकेशने पत्रात म्हटले आहे.

सर्वकाही जॅकलीनसाठी…

- Advertisement -

अभिनेत्री जॅकलीनसाठी फर्नाडीसला लिहलेल्या पत्रात ठग सुकेश चंद्रशेखर यांनी म्हटले की, जॅकलीन ही पाळीव प्राण्यावर प्रेम करते. पाळीव प्राण्यांसाठी रुग्णालय बांधून प्राण्यांवर प्रेम करणाऱ्या जॅकलिन फर्नांडिसचे स्वप्न पूर्ण करण्याचा आपला उद्देश असल्याचा दावा सुकेश चंद्रशेखर यांने केला आहे.

हेही वाचा :चांद्रयान – 3 मोहीम प्रक्षेपणाच्या काऊंटडाऊनची घोषणा करणाऱ्या एन. वलरमथींचे निधन

आशिया खंडातील ठरणार एकमेव रुग्णालय

- Advertisement -

ठग सुकेश चंद्रशेखर याने पत्रात म्हटले आहे की, माझ्या बेबी डॉल (जॅकलीन फर्नाडीस) हीला माझे पाळीव प्राण्याबद्दलचे प्रेम लक्षात येईल. उभारण्यात येणारे हे रुग्णालय संपूर्ण आशिया खंडातील अशा प्रकारचे हे एकमेव रुग्णालय असेल. माझ्या टीमने सर्व काही गोळा केले असून ते बनवण्याचे काम सुरू झाले आहे. त्यात सुकेशने असेही सांगितले की, हे रुग्णालय 11 सप्टेंबर 2024 पासून म्हणजेच जॅकलिन फर्नांडिसच्या वाढदिवसानिमित्त उपचारासाठी खुले होणार आहे.

हेही वाचा : नरेंद्र मोदींच्या कार्यकाळात भारत करतोय प्रगती; विदेशी मीडियांनी केले मोदींचे कौतुक

आंतरराष्ट्रीय स्तरावरील बांधकाम व्यवसायिकाला दिले कंत्राट

सुकेश चंद्रशेखरने जॅकलीनला लिहलेल्या पत्रात म्हटले आहे की, त्यांने दक्षिण आणि संयुक्त अरब अमिरातीमधील एका बिल्डरला बांधकामाचे कंत्राट दिले आहे. या कामात कोणताही विलंब होऊ नये, यासाठी करार करण्यात आला असून, संपूर्ण रक्कमही देण्यात आली आहे. सर्व उपकरणे जर्मनीतून आयात केली जात आहेत. असे त्याने लिहलेल्या पत्रात म्हटले आहे.

- Advertisment -