घरताज्या घडामोडीVideo Viral: पोलिसांच्या तपासादरम्यान कैद्याने चक्क मोबाईल फोनच गिळला; डॉक्टरांनी विना ऑपरेशन...

Video Viral: पोलिसांच्या तपासादरम्यान कैद्याने चक्क मोबाईल फोनच गिळला; डॉक्टरांनी विना ऑपरेशन शरीराबाहेर काढला

Subscribe

आपण अनेक चित्रपटात, वेबसीरिजमध्ये कैदी कशा पद्धतीने जेलमध्ये मोबाईलचा वापर करतात आणि तो कसा लपवतात हे पाहिले आहे. अशाच पद्धतीने दिल्लीच्या तिहार जेलमध्ये एका कैद्याने पोलीस अधिकाऱ्यांना भीतीने मोबाईल गिळल्याचे घटना घडली आहे. या संबंधित कैद्याने मोबाईल गिळल्याचे समजाताच त्याला तातडीने एका रुग्णालयात दाखल करण्यात आले आणि त्यानंतर डॉक्टरांनी कोणतेही ऑपरेशन न करता त्याचा शरीराबाहेर हा मोबाईल काढला आहे.

माहितीनुसार, डॉक्टरांनी मोबाईल शरीराबाहेर काढण्यासाठी एंडोस्कोपीची मदत घेतली. ७ सेंटीमीटर लांब आणि ३ सेंटीमीटर रुंद मोबाईलला शरीराबाहेर काढण्यात डॉक्टरांना यश आले. जेव्हा ही घटना उघडकीस आली तेव्हा कैद्याला तातडीने जीबी पंत रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

- Advertisement -

गॅस्ट्रोएन्टेरोलॉजी विभागाचे डॉ. सिद्धार्थ यांनी वृत्तसंस्थाना एएनआयला सांगितले की, ‘बाहेरचा पदार्थ खाणाऱ्या रुग्णाला १५ जानेवारीला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. जेव्हा त्याच्या पोटाचे एक्स-रे केले, तेव्हा त्याच्या पोटात मोबाईल असल्याचे समोर आले.’

- Advertisement -

डॉ. सिद्धार्थ यांनी दिलेल्या माहितीनुसार, मोबाईल फोन गिळणे खूप कठीण आहे आणि असे फक्त काही व्यक्ती करू शकतात जे यापूर्वीही असे करत होते. सर्वसाधारपणे जेलमधील कैदी अधिकाऱ्यांपासून लपवण्यासाठी अशा गोष्टी करतात. ज्या लोकांना अशा गोष्टींची सवय असते तेच लोकं असे करू शकतात. ही टेक्निकली डिमांडिंग प्रक्रिया आहे. आतापर्यंत डॉक्टरांनी अशा १० केसेस हाताळल्या आहेत.


हेही वाचा – चेन स्मोकर बनला चिम्पांजी! स्वत:चं लायटर पेटवून दररोज पितो 40 सिगारेट


 

Priyanka Shinde
Priyanka Shindehttps://www.mymahanagar.com/author/spriyanka/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सोशल मीडियावर काम करण्याची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -