घरट्रेंडिंगभयंकर ! टीकटॉक व्हिडीओत सापाला ठार करून जाळले

भयंकर ! टीकटॉक व्हिडीओत सापाला ठार करून जाळले

Subscribe

लोकप्रिय होण्यासाठी कोण काय करेल याचा काही नेम नाही. त्यातूनच आता सोशल मीडियाला माध्यम करून अनेकजण नाव व पैसा कमावत आहेत. पण प्रसिद्धीच्या हा हव्यासापायी मानवी संवेदनाही बोथट होत असल्याचे गुजरातमधील एका व्हिडिओतून समोर आले आहे. हा टीक टॉक व्हिडीओ असून गुजरातमधील महीसागर जिल्ह्यातील चार मुलांनी तयार केला आहे. यात दोन तरुण हातात लांबलचक साप घेऊन गाण्यावर नाचताना दिसत आहेत. नंतर या चार मुलांनी त्या सापाला ठार केल्याचं व्हिडीओत दिसत आहे. एवढ्यावर हे क्रौर्य थांबल नाही तर त्या सापाला त्यांनी गाणं म्हणता म्हणता जाळल्याचही या व्हिडिओमध्ये दिसत आहे. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर वनविभागाने या चारही तरुणांना अटक केली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -