घरटेक-वेकTikTok पुन्हा सुरू होणार? चीनमधून मुख्यालय हलवण्याची तयारी!

TikTok पुन्हा सुरू होणार? चीनमधून मुख्यालय हलवण्याची तयारी!

Subscribe

कोरोनाचा विषाणू आणि त्यापाठोपाठ अक्साई चीन-गलवान प्रांतात चीनी सैन्याने केलेली आगळीक या पार्श्वभूमीवर भारतात चीनी मोबाईल अॅप्लिकेशन्सवर बंदी घालण्यात आली आहे. त्यामध्ये प्रचंड लोकप्रिय असलेलं व्हिडिओ अॅप्लिकेशन असलेल्या TikTokचा देखील समावेश होता. त्यामुळे भारतातील लाखो TikTok Usersची पंचाईत झाली आहे. मात्र, आता या सर्व परिस्थितीत टिकटॉकडून हालचाली सुरू झाल्या आहेत. भारतासारखी बाजारपेठ गमावणं टिकटॉकला परवडणारं नसल्यामुळे टिकटॉकने त्यांचं चीनमधील मुख्यालय हलवण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. मुख्यालय दुसऱ्या देशात हलवून Appवर घालण्यात आलेली बंदी उठवण्यासाठी टिकटॉक प्रयत्न करण्याची शक्यता आहे. यासंदर्भात टीकटॉकने लंडन आणि कॅलिफोर्निया या दोन पर्यायांवर काम करायला सुरुवात केल्याची देखील माहिती मिळत आहे.

अमेरिका अधिक सतर्क

रॉयटर्सने दिलेल्या वृत्तानुसार टिकटॉक प्रशासनाची यासंदर्भात लंडन प्रशासन आणि कॅलिफोर्निया प्रशासनासोबत बोलणी सुरू आहेत. चीनपासून पूर्णपणे संबंध तोडण्यासाठी टिकटॉकनं हे पाऊल उचलल्याचं सांगितलं जात आहे. दरम्यान, कोरोना विषाणूच्या प्रसाराच्या मुद्द्यावरून अमेरिका आणि चीनमधले संबंध तणावपूर्ण झाले आहेत. त्यामुळे टिकटॉकची देखील अमेरिकन प्रशासनाकडून कसून चौकशी करण्यात येत आहे. चीनी सरकारने युजर्सची माहिती देण्यासंदर्भात टिकटॉकवर दबाव टाकला असू शकतो, अशी शंका अमेरिकेला असल्यामुळे अमेरिकन प्रशासन अधिक सतर्क राहून चौकशी करत आहे. या पार्श्वभूमीवर कॅलिफोर्नियाऐवजी लंडनमध्येच टिकटॉकचं मुख्यालय होण्याची दाट शक्यता आहे.

- Advertisement -

दरम्यान, मुख्यालय हलवल्यानंतर देखील भारतासोबतच ज्या ज्या देशांनी टिकटॉकवर बंदी घातली आहे, त्या देशाकडून काय निर्णय घेतला जातो, यावर सारंकाही अवलंबून असणार आहे. शिवाय, टिकटॉक सुरू झाल्यानंतर देखील जुने युजर्स आणि त्यांच्या अकाऊंटवर असणारे लाखो फॉलोअर्स तसेच राहतील की पुन्हा शून्यापासून सुरूवात करावी लागेल, हे देखील अद्याप स्पष्ट होऊ शकलेलं नाही.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -