TikTok : मुलीचे झाले ४ मिलियन फॉलोअर्स, भाजप नेता केक घेऊन पोहोचला घरी

सध्या टिकटॉक तरूणांमध्ये प्रचंड फेमस आहे. तरूण आपला बरासचा वेळ या टिकटॉकवर घालवतात. एखादी घटना घडली किंवा नवी चित्रपट, गाणं आलं की लगेचच त्यावर टिकटॉकचा व्हिडिओ तयार होतोच.  टिकटॉकवर फेमस होण्यासाठी टिकटॉक स्टार्स मजेदार व्हिडिओ बनवत असतात. त्यामुळे त्यांचे फॉलोवर्स वाढतात. पण यूपीमध्ये एक वेगळीच घटना घडली आहे. टिकटॉकवर शिवानी कुमारचे ४ मिलियन फॉलोअर्स पुर्ण झाले म्हणून भाजपा नेता केक घेऊन तीच्या घरी पोहचला.

@shivani_kumari321

aaj me bahut khush hu aap logo ne mujhe itana pyar diya or yesi hi dete rahiye ga [email protected] @tiktok_india #shivani_kumari321

♬ original sound – shivani_kumari321

यूपीमधील बिधुना येथे राहणाऱ्या शिवानी कुमारीचे ४ मिलीयन फॉलोवर्स पुर्ण झाले. नगर पंचायत बिधूना येथील भाजप नेते आणि आमदार प्रतिनिधी देवेश शाक्य हे त्यांच्या घरी केक घेऊन साजरी करण्यासाठी गेले. आणि केक कापून आशीर्वादही दिला. हा व्हिडिओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे.

@shivani_kumari321

@tiktok @tiktok_india #shivani_kumari321 ❤❤??????

♬ Original Sound – Unknown

शिवानीने टिकटॉकवर व्हिडिओ पोस्ट केला आहे,  यात शिवानी व्हिडिओत दिसत आहे. आणि तीच्या मागे देवेश शाक्य दिसत आहे. ती म्हणते, ‘नमस्कार मित्रांनो … आज माझे ४ मिलियन  फॉलोअर्स पुर्ण झाले त्यामुळे आमदार आम्हाला भेटायला आले आहेत. केक देखील कापला आहे.

@shivani_kumari321

@tiktok @tiktok_india #shivani_kumari321 ye toh fanni ho gyi pta nhi kon bhai aa gya bich me ????

♬ original sound – Arif Arsh – Arif Arsh

शिवानीच्या या व्हिडिओला आतापर्यंत ११ लाखाहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. तसेच, १ लाखाहून अधिक लाईक्स आणि ७ हजार कमेंट मिळाल्या आहेत. शिवानी कुमारचे खूप चाहते आहेत. शिवानीचा टिकटॉकवरचा अंदाज नेटकऱ्यांना खूप आवडतो.


हे ही वाचा – आधी १४ दिवस आणि नंतर ७ दिवस ‘तो’ झाला स्वत:च्या कारमध्येच क्वारंटाईन कारण…