घरताज्या घडामोडीसैनिकाच्या पत्नीबरोबर केला टिकटॉक व्हिडिओ आणि खावा लागला बेदम मार!

सैनिकाच्या पत्नीबरोबर केला टिकटॉक व्हिडिओ आणि खावा लागला बेदम मार!

Subscribe

मोतीहारी जिल्ह्यातील रामगडवा पोलिस स्टेशन परिसरात ही घटना घडली.

सध्या टिकटॉक तरूणांमध्ये प्रचंड फेमस आहे. तरूण आपला बरासचा वेळ या टिकटॉकवर घालवतात. एखादी घटना घडली किंवा नवी चित्रपट, गाणं आलं की लगेचच त्यावर टिकटॉकचा व्हिडिओ तयार होतोच. पण बऱ्याचदा टिकटॉक व्हिडिओ तयार करताना मर्यादा ओलांडल्या जातात. अशीच एक घटना बिहारमधील मोतिहारीमधून समोर आली आहे. जिथे एका तरूणाने दुसर्‍या गावातल्या एका सैनीकाच्या पत्नीसह टिकटोक व्हिडिओ बनविला. व्हिडिओ व्हायरल होताच शिपाई संतप्त झाला आणि त्याने मुलाला जोरदार मारहाण केली. मुलाची प्रकृती सध्या चिंताजनक असून त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

मोतीहारी जिल्ह्यातील रामगडवा पोलिस स्टेशन परिसरात ही घटना घडली आहे. या गावात राहणाऱ्या विकी कुमारला संशयावरून लोखंडी पाईपाने सैनीकाने त्या माणसाला निर्घृणपणे मारहाण केली. त्याचबरोबर तरुणाच्या कुटुंबातील सदस्यांनाही सैनीकाने मारहाण केली.

- Advertisement -

जखमी अवस्थेत मुलाला मोतिहारी येथील खासगी नर्सिंग होममध्ये दाखल करण्यात आले आहे. डॉक्टरांचे म्हणणे आहे की, त्या तरूणाची प्रकृती चिंताजनक आहे,  ७२ तासांनंतरच त्याच्या प्रकृतीबद्दल काहीतरी सांगितले जाऊ शकते. तर ग्रामस्थांचे म्हणणे आहे की, एका व्हिडिओमुळे हा वाद झाला आहे. तर विक्कीचे काका म्हणाले की, पुतण्यासह संपुर्ण कुटुंबावर हल्ला करण्यात आला आहे. यासंदर्भात पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.


हे ही वाचा – Video – क्वारंटाईन सेंटरमध्ये अश्लील डान्स, व्हिडिओ व्हायरल!

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -