घरCORONA UPDATEटिक टॉकच्या माध्यमातून कोरोनासंदर्भात भारतीय मुस्लीमांचे ब्रेन वॉशिंग

टिक टॉकच्या माध्यमातून कोरोनासंदर्भात भारतीय मुस्लीमांचे ब्रेन वॉशिंग

Subscribe

कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी देशात २१ दिवसांचा लॉकडाऊन घोषित करण्यात आला आहे. लॉकडाऊनचा हा कालावधी संपण्यासाठी अवघे ११ दिवस उरलेले असतानाच टिक टॉकच्या माध्यमातून भारतीय मुस्लिमांची दिशाभूल करणारे व्हिडीओ मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहेत. यात कोरोना मुस्लिमांना काहीही करू शकत नाही असा दावा पवित्र कुराणचा हवाला देत करण्यात येत आहे.

हे टिक टॉक व्हिडीओ समाजकंटकांकडून व्हायरल केले जात असून याचे धागेदोरे शेजारील राष्ट्राशी जुळलेले असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. चीनमधील एका शॉर्टफिल्मवर आधारित हे टिक टॉक व्हिडिओ बनवण्यात आले आहेत. यात मुस्लीम बांधवांना कोरोनाचा धोका नाही. यामुळे मास्क , सॅनिटायजर आणि सोशल डिस्टन्सिंग सारख्या गोष्टींपासून लांब राहा. हे सगळं करण्याची आपल्याला गरज नसल्याचे या टिक टॉक व्हिडीओत सांगण्यात येत आहे. दिल्लीमधील डिजिटल लॅब वॉयझर इंफोसेकने या आठवड्यात व्हायरल झालेल्या ३०,००० टिक टॉक व्हिडीओ क्लिप्सची चाचणी केली. यात सगळ्याच व्हिडीओमध्ये काही गोष्टींमध्ये साम्य असल्याचे तज्ज्ञांना आढळले. यावरून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशात मुस्लीम बांधवांचे ब्रेन वॉशिंग करण्याचा प्रयत्न सुरू असल्याची धक्कादायक बाब निदर्शनास आली आहे. या व्हिडीओमध्ये मुस्लीम पेहरावात अनेक तरुण व वयस्क व्यक्ती दाखवण्यात आल्या आहेत. ज्या कोरोनाची काळजी करण्याचे कारण नाही बिनधास्त राहा. असे आवाहन करताना दिसत आहेत. या महामारीचा उल्लेख काही तरुण ‘अल्लाह की NRC’ असा करताना दिसत आहेत. कोरोना नावाचा कुठलाही व्हायरस नसून कोणाला जगवायचे व कोणाला बोलवायचे ही सगळी अल्लाची इच्छा असल्याचा संदेश यात काहीजण देत आहेत. तर १३ सेकंदाच्या एका व्हिडीओमध्ये काही तरुणतरुणी हवेत मास्क उडवताना दिसत आहे.
तर दुसऱ्या एका व्हिडीओमध्ये ‘COVID-19 मुळे मु्स्लीमांना काही फरक पडणार् नाही. असे कुराणचा हवाला देत सांगण्यात आले आहे. तसेच हात मिळवल्याने व गळाभेट घेतल्याने आजार बरे होतात असेही या व्हिडीओमध्ये सांगण्यात आले आहे. वॉयझर इंफोसेकने या व्हिडीओंची डिजिटल तपासणी करण्यासाठी गृहमंत्रालयाकडे सोपवले आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -