घर देश-विदेश उत्तर प्रदेशमध्ये भाविकांवर काळाचा घाला; ट्रॅक्टर नदीत उलटून 9 जणांचा मृत्यू

उत्तर प्रदेशमध्ये भाविकांवर काळाचा घाला; ट्रॅक्टर नदीत उलटून 9 जणांचा मृत्यू

Subscribe

उत्तर प्रदेशमधील सहारनपूरमध्ये भाविकानी भरलेला एका ट्रॅक्टरची ट्रॉली नदी उलटल्याची घटना घडल्यानंतर घटनास्थळी पोलीस आणि समाजसेवी संघटनानी धाव घेत बचावकार्य सुरू केले.

लखनऊ : एका धार्मिक स्थळी दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांचे ट्रॅक्टर नदीत उलटून झालेल्या अपघात 9 जणांचा मृत्यू झाला. ही घटना उत्तर प्रदेशमधील सहारनपूरमध्ये बुधवारी घडली. या घटनेत एक 15 वर्षीय मुलगा बेपत्ता असल्याची माहिती समोर येत आहे.(Time attack on devotees in Uttar Pradesh; 9 people died after the tractor overturned in the river)

उत्तर प्रदेशमधील सहारनपूरमध्ये भाविकानी भरलेला एका ट्रॅक्टरची ट्रॉली नदी उलटल्याची घटना घडल्यानंतर घटनास्थळी पोलीस आणि समाजसेवी संघटनानी धाव घेत बचावकार्य सुरू केले. या घटनेत आतापर्यंत 9 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे तर 15 वर्षीय मुलगा बेपत्त झाला आहे. त्याला शोधण्याचे काम सुरू आहे. अपघाताची माहिती मिळताच जिल्हा दंडाधिकारी डॉ. दिनेश चंद्र, एसएसपी डॉ. विपिन टाडा, एसपी सिटी अभिमन्यू मांगलिक मय फोर्स घटनास्थळी पोहोचले. पोलिसांनी जखमींना बाहेर काढले.

- Advertisement -

हेही वाचा : चांद्रयान-3 च्या यशस्वी लॅंडिंगची जगभराने घेतली दखल; एलन मस्कपासून NASA पर्यंत सगळेच म्हणतात..

धामोळा नदी उलटली ट्रॉली

एका धार्मिक स्थळी दर्शनाला जाणाऱ्या या भाविकंनी बुधवावरी जाण्यापूर्वी सहारनपूरच्या देहत कोतवाली भागात एका नातेवाइकांकडे गेले होते. तिथून ते परतत असताना जनता रोडवरील बुणकी गावाजवळ धामोळा नदीत त्यांची ट्रॅक्टर-ट्रॉली उलटली. या अपघातातील मृतांची संख्या आता 9 वर पोहोचली आहे. सौरभ नावाचा 15 वर्षांचा मुलगा अद्याप बेपत्ता असल्याची माहिती आहे. बचाव पथकही त्याचा शोध घेत आहेत. मात्र अद्याप तो मिळून आला नसल्याची माहिती आहे.

- Advertisement -

हेही वाचा : चांद्रयान-3 च्या यशस्वीतेसोबतच भारताचे आणखी एक यश; वाचा- कोणते परीक्षण झाले यशस्वी?

अपघातात यांचा झाला मृत्यू

या अपघातात बलाहेडी येथील रहिवासी मंगलेश (55), त्यांची नात अदिती (3), टीना (13), सुलोचना (58) यांचा जागीच मृत्यू झाला. बचाव पथकाने नदीतून नितीश (7), किरण (30), एकता (14), कामिनी (8) आणि अक्षय (22) यांचे मृतदेह बाहेर काढले. या अपघातात सेठपाल आणि मंगेराम यांच्यासह 20 हून अधिक भाविक जखमी झाले आहेत. पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवले असून जखमींवर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

- Advertisment -