घरदेश-विदेशBengal Election 2021: तिसऱ्या टप्प्यात TMC-BJP कार्यकर्ते आमने-सामने; ममता दीदींचा केंद्राच्या सुरक्षेवर...

Bengal Election 2021: तिसऱ्या टप्प्यात TMC-BJP कार्यकर्ते आमने-सामने; ममता दीदींचा केंद्राच्या सुरक्षेवर प्रश्न

Subscribe

पश्चिम बंगालमध्ये आज मंगळवारी ३१ जागांवर तिसऱ्या टप्प्यातील मतदान सुरू आहे. या मतदानाच्या रणधुमाळीत राज्याच्या वेगवेगळ्या भागात आजही हिंसक वातावरण असल्याचे समोर आले आहे. यावेळी हुबळीमध्ये भाजप कार्यकर्त्याची हत्या करण्यात आली तर दक्षिण परगना येथे भाजपवर टीएमसीच्या कार्यकर्त्यांना मतदान करण्यापासून अडवले असा आरोप लावण्यात आला. तर उलुबेरिया येथे टीएमसी नेत्याच्या घरी EVM आणि VVPAT आढळल्याने एकच खळबळ उडाली. यासह बंगालच्या आरमबाग येथे मंगळवारी BJP-TMC कार्यकर्ते एकमेकांना भिडल्याचेही समोर आले.

मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी बंगालच्या आरमबाग येथे मतदान प्रक्रिया सुरू असताना BJP-TMC कार्यकर्ते आमने-सामने आलेत. यामुळे मतदानाच्या तिसऱ्या टप्प्यातील वातावरण चांगलेच तणावपूर्ण झाले. हे हिंसक वातावरण नियंत्रणात आणण्यासाठी सुरक्षा दलाला बोलवण्यात आले.

- Advertisement -

आरमबागमध्ये घडलेल्या या प्रकारानंतर टीएमसी उमेदवार सुजाता मंडल यांनी केंद्राच्या संरक्षण दलावर आरोप करून अनेक प्रश्नचिन्ह उपस्थितीत केले. यावेळी सुजाता मंडलने असे सांगितले की, जेथे टीएमसीचं वर्चस्व मजबूत आहे तिथे परिस्थिती योग्य नसल्याचे दिसतेय. आरमबागमधील मतदान केंद्र ४५ वरील मतदार टीएमसीला आपले मतं देत आहेत, मात्र त्यांचे मत भाजपाला जात आहे. तसेच मतदान प्रक्रियेदरम्यान या ठिकाणी होणारं हिंसक वातावरण रोखण्यास केंद्रीय सुरक्षा असमर्थ ठरतेय, अशीही टीका त्यांनी केली.

- Advertisement -

याचपार्श्वभूमीवर पश्चिम बंगालमधील मतदान प्रक्रियेदरम्यान होणाऱ्या घटनांबाबत पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी देखील अनेक प्रश्न उपस्थितीत केले आहे. ‘बंगालमध्ये केंद्रीय सुरक्षा दलाचा वापर गैरप्रकारे केला जात आहे. या सुरू असलेल्या गैरप्रकारासंदर्भात कित्येक वेळा निवडणूक आयोगाकडे तक्रारी केल्यात. मात्र कोणतेही पाऊल निवडणूक आयोगाकडून उचलण्यात आले नाही.’. अशी टीका देखील ममता दीदींनी आयोगावर केली असून केंद्राच्या सुरक्षेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थितीत केले आहे.


Bengal Election 2021: TMC नेत्याच्या घरातून EVM आणि VVPAT जप्त; EC कडून सेक्टर अधिकाऱ्याचे निलंबन

 

Harshada Shinkarhttps://www.mymahanagar.com/author/sharshada/
गेल्या ५ वर्षांपासून प्रिंट आणि डिजिटल मीडिया क्षेत्राचा अनुभव. लाईफ स्टाईल, फॅशन, महिलांसंबधित विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -