घरदेश-विदेश'बांगलादेश दौर्‍यावर मोदींनी केली आचारसंहिता भंग', TMC ची EC कडे तक्रार दाखल

‘बांगलादेश दौर्‍यावर मोदींनी केली आचारसंहिता भंग’, TMC ची EC कडे तक्रार दाखल

Subscribe

तृणमूल कॉंग्रेसकडून पंतप्रधान मोदी यांच्यावर कठोर कारवाईची मागणी

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या बांगलादेश दौर्‍यावरुन सोशल मीडियावर चांगलीच चर्चो सुरू आहे. यासोबतच तृणमूल कॉंग्रेस बांगलादेश दौर्‍यावरुन पंतप्रधान नरेंद्र मोदींना सतत घेराव घालत आहे. आता तृणमूल कॉंग्रेस पक्षाच्या (TMC) नेत्यांनी या संदर्भात निवडणूक आयोगाकडे (EC) तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीत असे म्हटले की, पंतप्रधान मोदी बांगलादेश दौऱ्यावर असताना त्यांनी आचारसंहितेचा भंग केला, असा आरोप केला आहे. तसेच टीएमसीचे असेही म्हणणे आहे, पंतप्रधान नरेंद्र मोदी बंगलादेशातील मतुआ समाजाच्या मंदिरात दर्शनासाठी गेले होते, ज्यामुळे त्यांच्याकडून निवडणूक आचारसंहितेचा भंग झाला आहे. त्यामुळे तृणमूल कॉंग्रेसने पंतप्रधान मोदी यांच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

- Advertisement -

TMC ने केला असा आरोप

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे बांगलादेश दौऱ्यावर असताना त्यांनी पश्चिम बंगालचे खासदार शांतनु ठाकूर यांना सोबत घेतले होते. त्यांचे कोणतेही सरकारी पद नसताना ते मोदींसोबत होते, असा आरोप तृणमूल कॉंग्रेसकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर करण्यात आला आहे. यासह मतदारांवर प्रभाव पाडण्यासाठी बांगलादेशमधील मंदिरांत जाऊन भेट देण्याचा आणि दर्शन घेण्याचा एकच हेतू होता, असेहा काँग्रेसने हे आरोप करताना म्हटले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी २६ मार्च रोजी दोन दिवसीय दौर्‍यावर बांगलादेश दौर्‍यावर आहेत. त्यावेळी त्यांनी मतुआ समाजातील ओराकांडीच्या मंदिरालाही भेट दिली. त्याचवेळी मतुआ समाजाचे संस्थापक असणारे हरिश्चंद्र ठाकूर यांच्या जन्मस्थळालाही भेट दिली. तसेच बांगलादेशच्या स्वातंत्र्य दिनाच्या ५० व्या वर्धापन दिनानिमित्त पंतप्रधान मोदींनी तेथील कार्यक्रमास हजेरी लावली होती. त्यावेळी त्यांनी मतुआ समाजातील लोकांशी संवाद साधला होता.

- Advertisement -

मतुआ समाजाचा कितपत पडणार प्रभाव?

मिळालेल्या माहितीनुसार, पश्चिम बंगालमधील मतुआ समाजाची लोकसंख्या साधारण २ कोटी आहे. बंगालमधील सुमारे ५० जागांवर या समुदायाचा प्रभाव असल्याचे समजते. पश्चिम बंगाल निवडणुकीत मतांच्या बाबतीत हा समुदाय खूप महत्वाचा आहे. अशा परिस्थितीत भाजप, टीएमसीसह अन्य राजकीय पक्ष सतत मतुआ समाजातील लोकांवर प्रभाव पाडण्यासाठी प्रयत्न करीत असल्याचेही सांगितले जात आहे.


Harshada Shinkarhttps://www.mymahanagar.com/author/sharshada/
गेल्या ५ वर्षांपासून प्रिंट आणि डिजिटल मीडिया क्षेत्राचा अनुभव. लाईफ स्टाईल, फॅशन, महिलांसंबधित विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -