घरदेश-विदेशभाजपासाठी टीएमसी हा एकमवे राष्ट्रीय पर्याय; खासदार महुआ मोईत्रा यांचे काँग्रेसला प्रत्युत्तर

भाजपासाठी टीएमसी हा एकमवे राष्ट्रीय पर्याय; खासदार महुआ मोईत्रा यांचे काँग्रेसला प्रत्युत्तर

Subscribe

शिलाँग : काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी मेघालयात अलीकडेच झालेल्या निवडणूक रॅलीत भाजपा आणि तृणमूल काँग्रेसवर (TMC) जोरदार हल्ला चढवला होता. राहुल गांधी यांनी टीएमसीला भाजपाची बी टीम म्हटले आहे. भाजपासाठी टीएमसी हा एकमवे राष्ट्रीय पर्याय असल्याचे प्रत्युत्तर टीएमसी खासदार महुआ मोईत्रा यांनी दिले आहे.

- Advertisement -

मेघालयमध्ये 27 फेब्रुवारीला होणारी विधानसभा निवडणूक काँग्रेस स्वबळावर लढवत आहे. या निवडणुकीसाठी काँग्रेसने सर्व 60 जागांवर उमेदवार उभे केले आहेत. या प्रचारात काँग्रेसने भाजपाबरोबरच तृणमूल काँग्रेसला टीकेचे लक्ष्य केले आहे. मेघालयमध्ये भाजपाला विजयी करण्यासाठी पश्चिम बंगालमधील सत्तारूढ पार्टी (तृणमूल काँग्रेस) मदत करत असल्याचा दावा राहुल गांधी यांनी केला होता.

उत्तर शिलाँगमधील टीएमसीचे उमेदवार एल्गिवा ग्वेनेथ यांच्या समर्थनार्थ गुरुवारी खासदार महुआ मोईत्रा यांनी प्रचारसभा घेतली. आपण घरी बसून भाजपा आणखी एक निवडणूक जिंकत असल्याचे पाहायचे आहे का, असा सवाल त्यांनी केला. काँग्रेस तर, एकापाठोपाठ एक राज्य गमावत आहे. भाजपाला पराभूत करण्यात काँग्रेस सक्षम असती, तर आम्हाला विधानसभा निवडणूक लढवण्याची गरज नव्हती. काँग्रेस येथे निवडणूक जिंकण्यात अपयशी ठरली आहे. म्हणूनच, जनतेला पर्याय उपलब्ध करून देण्यासाठी आम्हाला पुढे यावे लागले. टीएमसी हाच भाजपाचा एकमेव पर्याय आहे, असे जोरदार प्रत्युत्तर खासदार महुआ मोईत्रा यांनी दिले.

- Advertisement -

याआधी तृणमूल काँग्रेसचे उपाध्यक्ष जयप्रकाश मजुमदार यांनी देखील राहुल गांधी यांना ‘अपरिपक्व’ संबोधून टीका केली आहे. राहुल गांधी यांनी मेघालयात टीएमसीवर केलेली टीका म्हणजे त्यांच्या राजकीय ‘अपरिपक्वते’चे द्योतक असल्याचे जयप्रकाश मजुमदार यांनी म्हटले होते. आपल्याला पुढे काय करायचे आहे, याचा विचार ते करत नाही. वस्तुत: काँग्रेसलाच आत्मपरिक्षणाची गरज आहे. त्यांना आघाडी करण्याची गरज असतानाही ते अद्याप 50 आणि 60च्या दशकातील मानसिकतेत वावरत आहेत, अशी बोचरी टीकाही त्यांनी केली.

हेही वाचा – पोलीस भरतीतील बेपर्वाईने नायगाववासीयांच्या आरोग्याला धोका, शेजारी प्रसुतीगृह असूनही दुर्लक्ष

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -