घरदेश-विदेश'सर्वात मोठे प्पपू', TMCनेत्यांनी टी-शर्टरवर अमित शाहांचा फोटो छापत डिवचले

‘सर्वात मोठे प्पपू’, TMCनेत्यांनी टी-शर्टरवर अमित शाहांचा फोटो छापत डिवचले

Subscribe

तृणमूल काँग्रेस आणि भाजप हा संघर्ष राजकीय वर्तुळामध्ये नेहमीच चर्चेच्या केंद्रस्थानी असतो. दरम्यान आरोप प्रत्यारोपाच्या राजकारणात आता तृणमूल काँग्रेसने पुन्हा एकदा भाजपचे ज्येष्ठ नेते अमित शाहा यांना डिवचंल आहे. तृणमूलने भाजपला सडेतोड उत्तर देण्यासाठी टी-शर्ट छापले असून या टी-शर्टवर अमित शाहांचा  ‘पप्पू’ असा उल्लेख करण्यात आला आहे.

 

- Advertisement -

भाजप मधील अनेक नेते कार्यकर्ते काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्यावर हल्लाबोल करण्यासाठी ‘ पप्पू’ हा शब्द वारंवार वापरला जातो. मात्र हीच री ओढत आता ममता बॅनर्जी यांनी भाजपवर जोरदार टीकास्त्र डागलं आहे. अमित शाहा हे ‘भारतातील सर्वात मोठे पप्पू ‘ असा मजकूर असणारा  टीशर्ट छापण्यात आला आहे. इतकंच काय तर अमित शाहा यांचं एक कार्टुनही त्यावर छापण्यात आलं आहे. तृणमूल काँग्रेस पक्षातर्फे या टी-शर्टच्या छपाईसाठी जोरदार तयारी सुरू करणार असून आगामी दिवसात येणाऱ्या दुर्गा पुजा मोहोत्सवादरम्यान याचे वाटप करण्यता येईल तसचे भाजप विरोधात मोहीम राबवली जाईल

- Advertisement -

तृणमूल काँग्रेसचे खासदार डेरेक ओब्रियन यांनी पीटीआय या वृत्तसंस्थेशी बोलतांना या टी-शर्टबद्दल माहीत दिली आहे. ‘थट्टा करणे हा संवाद साधण्याचा प्रभावी मार्ग आहे. आमचे सरचिटणीस अभिषेक बॅनर्जी यांनी केलेल्या वक्तव्यानंतर याची सुरूवात झाली आणि सोशल मिडीयावरील मोहीमेला वेग आला तिकडे देखील हा ट्रेंड गाजला यानंतर हे वाक्य आता टि-शर्ट स्वरुपात आलं आहे.’

 

कोळसा तस्करी प्रकरणी अभिषेक बॅनर्जी यांची 2 सप्टेंबरला इडीमार्फत कसून चौकशी करण्यात आली. यानंतर माध्यमांशी संवाद साधतांना ‘अमित शाहा हे भारतातील सर्वात मोठे पप्पू असल्याचं त्यांनी म्हटलं.’ याच्या दुसऱ्या दिवशीच अभिषेक यांचे चूलत बंधूंनी सोशल मिडियावर अमित शाहा यांचं कार्टुन असणारा तसचे प्पपू उल्लेख करणारं टी-शर्ट परिधान करत फोटो शेअर केले

हे ही वाचा – जितेंद्र आव्हांडांच्या गटबाजीला वैतागत, राष्ट्रवादीच्या नेत्याचा शिंदे गटात प्रवेश

Mukta Londhe
Mukta Londhehttps://www.mymahanagar.com/author/mukta/
गेली दोन वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, रिपोर्टींग आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -