घरदेश-विदेशTMC ने केले काॅंग्रेसच्या Black Protest चे समर्थन; मल्लिकार्जून खर्गेंनी मानले आभार

TMC ने केले काॅंग्रेसच्या Black Protest चे समर्थन; मल्लिकार्जून खर्गेंनी मानले आभार

Subscribe

तृणमूल काॅंग्रेसच्या अध्यक्ष आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी बिगर काॅंग्रेसी-भाजप मुख्यमंत्र्यांशी भेटीगाठी सुरु केल्या होत्या. परंतु, राहुल गांधी यांची खासदारकी रद्द झाल्यानंतर टीएमसीदेखील काॅंग्रेसच्या बाजूने आल्याने हा काॅंग्रेससाठी एक सुखद धक्का मानला जात आहे.

काॅंग्रेसचे नेते राहुल गांधी यांची खासदारकी रद्द झाल्यापासून देशातील राजकीय वातावरण चांगलेच ढवळून निघाले आहे. सत्ताधारी पक्ष भाजप काॅंग्रेसने मागच्या तीन दिवसांपासून जोरदार हल्लाबोल केला आहे. याचे पडसाद 27 मार्च, सोमवारी संसदेतही पाहायला मिळाले. काॅंग्रेसने राहुल गांधी यांच्या खासदारकीच्या प्रकरणात काळे कपडे परिधान करत, सत्ताधाऱ्यांविरोधात आंदोलन केले या आंदोलनात काॅंग्रेसच्या माजी अध्यक्ष सोनिया गांधीदेखील सहभागी झाल्या होत्या.

मागच्या आठ दिवसांपासून विरोधी पक्षाच्या एकजुटीसाठी काॅंग्रेसला वगळून अन्य विरोधी 14 पक्ष एकत्र आले होते. तृणमूल काॅंग्रेसच्या अध्यक्ष आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी बिगर काॅंग्रेसी-भाजप मुख्यमंत्र्यांशी भेटीगाठी सुरु केल्या होत्या. परंतु, राहुल गांधी यांची खासदारकी रद्द झाल्यानंतर टीएमसीदेखील काॅंग्रेसच्या बाजूने आल्याने हा काॅंग्रेससाठी एक सुखद धक्का मानला जात आहे. राहुल गांधी खासदारकी प्रकरणात सत्ताधारी पक्ष भाजपविरोधात आता सर्व विरोधक एकवटल्याचेच चित्र दिसत आहे.

- Advertisement -

 काॅंग्रेसने विरोधी पक्षांची बैठक बोलावली

काँग्रेसच्या अध्यक्षतेखाली विरोधी पक्षांची बैठक पार पडली. काँग्रेस, द्रमुक, सपा, जेडीयू, बीआरएस, सीपीएम, आरजेडी, एनसीपी, सीपीआय, आययूएमएल, एमडीएमके, केसी, टीएमसी, आरएसपी, आप, जम्मू काश्मीर एनसी, उद्धव गट या पक्षांचे खासदार यात सहभागी झाले होते. संसदेतील मल्लिकार्जुन खर्गे यांच्या चेंबरमध्ये ही बैठक झाली. या सभेला बहुतांश नेते काळे कपडे परिधान करून आले होते.

मल्लिकार्जुन खर्गे यांचे ट्वीट

काॅंग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी ट्वीट केले आहे, लोकशाहीसाठी काळा अध्याय… सत्ताधारी पक्ष पहिल्यांदाच संसद ठप्प करत आहे का? कारण मोदीजींच्या जिवलग मित्राची काळी कृत्ये उघड होत आहेत. विरोधक जेपीसीच्या मागणीवर ठाम आहे, असे ट्वीट खर्गे यांनी केले आहे.

- Advertisement -

( हेही वाचा: राहुल गांधींच्या खासदारकीवरुन काँग्रेस आक्रमक; काळे कपडे परिधान करून सरकारचा निषेध )

काँग्रेस खासदार गौरव गोगोई म्हणाले, आज ही गोष्ट सर्वत्र पोहोचली आहे की, पंतप्रधान मोदींनी राहुल गांधींचे सदस्यत्व रद्द केले आहे जेणेकरून ते त्यांचे जवळचे मित्र अदानी यांना वाचवू शकतील. आमच्या पक्षाचे लोक आंदोलन करत आहेत, राहुल गांधींवर आरोप झाले, पण त्यांना एकदाही (सभागृहात) बोलू दिले गेले नाही.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -