अशा बंडखोरांना तर… सिंधिया यांच्या काँग्रेस वापसीवर जयराम रमेश यांचे टीकास्त्र

to rebels like these jairam ramesh said on the possibility of jyotiraditya scindias retune to the party

काँग्रेस सोडून भाजपामध्ये दाखल झालेल्या पक्ष नेत्यांच्या वापसीबाबत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते जयराम रमेश यांनी मोठं विधान केलं आहे. पक्षापासून फारकत घेतल्यानंतर शांत असलेले आणि काँग्रेसविरोधात काहीही न बोलणारे कपिल सिब्बल यांच्यासारखे नेते पुन्हा पक्षात येऊ शकतात, मात्र ज्योतिरादित्य सिंधिया आणि हिमंता बिस्वा सरमा यांच्यासारखे नेते काँग्रेसला सतत विरोध करत असल्याचे दिसतेय. त्यामुळे काँग्रेस विरोधी विधान करणाऱ्यांना बंडखोरांना पक्षात परत येण्याची संधी कधीच मिळणार नाही असं जयराम रमेश म्हणाले आहेत.

जयराम रमेश पुढे म्हणाले की, असे अनेक नेते आहेत जे पक्ष सोडल्यानंतर सतत पक्षाविरोधात बोलत आहेत, त्यामुळे अशा लोकांना पुन्हा घेतले जाणार नाही. मात्र असे अनेक नेते आहेत जे पक्षापासून फारकत घेतल्यानंतर स्वत:ची आणि काँग्रेसची प्रतिष्ठा लक्षात घेऊन गप्प बसतात, असे नेते इच्छा असल्यास पुन्हा पक्षात प्रवेश करू शकतात.भारत जोडो यात्रेदरम्यान जयराम रमेश यांनी हे वक्तव्य केलं आहे. सध्या काँग्रेस पक्षाची भारत जोडो यात्रा मध्य प्रदेशातून जात आहे. आणि येत्या काही दिवसांत ती राजस्थानमध्ये दाखल होईल.

यादरम्यान एका वृत्तसंस्थेशी राहुल गांधी म्हणाले होते की, “माझा नमरोलॉडीवर विश्वास नाही. त्यामुळे मी या गोष्टी नंबरवर आधारित नाही. पण मी तुम्हाला सांगू शकतो की, कन्याकुमारी ते मध्य प्रदेश या प्रवासात लोकांचे प्रेम, विश्वास, लोकांची शक्ती या यात्रेला मिळाली. केरळमध्ये ही यात्रा यशस्वी होईल, पण कर्नाटकात अडचणी येतील, असे मीडियाने सांगितले, त्यानंतर आम्ही कर्नाटकात गेलो तेव्हा मीडियाने सांगितले की दक्षिण भारतात यात्रा चांगली निघेल, पण बाहेर पडणे कठीण होईल.

त्यानंतर तेलंगणा, आंध्र प्रदेशातही तेच घडले, जे कर्नाटकात घडले. मग आम्ही महाराष्ट्रात आलो, तेव्हा मीडियाने सांगितले, हिंदी पट्ट्यात प्रॉब्लेम येईल, महाराष्ट्रात प्रवास खूप चांगला होता, आता मध्य प्रदेशात आता मीडिया म्हणतोय, मध्य प्रदेशात खूप चांगला प्रतिसाद मिळाला, पण राजस्थानमध्ये अडचण येईल. तर पाहत राहा, कारण हा प्रवास आता काँग्रेस पक्षाच्या पुढे गेला आहे. भारताची समस्या, भारताच्या हृदयातील आवाज, भारताचा आत्मा, आता हा प्रवास तो उठवत आहे, त्यामुळे तो कुठे पोहोचेल, कुठे पोहोचणार नाही, हे आता कोणीच सांगू शकत नाही.


…तर हातात शस्त्रच असावं लागतं, शरद पोंक्षेंचं धारदार वक्तव्य