घरदेश-विदेश2024ला आम्हीच जिंकू, असे सांगणाऱ्यांना...; ठाकरे गटाचा भाजपावर निशाणा

2024ला आम्हीच जिंकू, असे सांगणाऱ्यांना…; ठाकरे गटाचा भाजपावर निशाणा

Subscribe

मुंबई : जंतर मंतरवर न्यायासाठी आंदोलन करणाऱ्या महिला कुस्तीपटूंच्या समाचारासाठी भाजपाचा एकही नेता, मंत्री गेला नाही. पण अहमदाबादच्या मोदी स्टेडियमवर क्रिकेट विश्वचषकाच्या फायनलला पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासह सगळेच हजर होते. भारत विश्वचषक जिंकू शकला नाही याचे दुःख आहे, पण जिंकल्यानंतर भाजपाने विश्वचषक ताब्यात घेऊन मिरवण्याची जी तयारी केली होती त्यावर मात्र पाणी पडले. 2024ला आम्हीच जिंकू, असे सांगणाऱ्यांना मोदी स्टेडियमवरच धक्का बसला, असे सांगत ठाकरे गटाने भाजपाला टोला लगावला आहे.

हेही वाचा – भारतीय क्रिकेटचे नेतृत्व भाजपाच्या ‘वंशवादा’कडे… ठाकरे गटाचा जोरदार हल्लाबोल

- Advertisement -

ऑस्ट्रेलियाने विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात स्वतःला झोकून दिले व आपण 9-10 सामने जिंकलेच आहेत, सगळेच फॉर्मात आहेत. त्यामुळे अंतिम सामनाही जिंकणारच अशा आत्मविश्वासात आपण राहिलो. भारतीय संघाची कामगिरी उत्तमच होती. जगातला सर्वेत्कृष्ट संघ म्हणून भारतीय संघास मान्यता आहे. पण ‘मोदी’ स्टेडियमवर अपयश आले म्हणून खचून जाता कामा नये. खऱ्या खेळात हे व्हायचेच! मोदी स्टेडियमवर राजकारण हरले; पण क्रिकेट जिंकले, असे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने सामना दैनिकातली अग्रलेखात म्हटले आहे.

भारताचा क्रिकेट संघ ‘वर्ल्ड कप’ जिंकेलच अशी हवा होती, पण सलग दहा सामने जिंकलेला भारतीय संघ अंतिम सामन्यात पराभूत झाला व क्रिकेटचे जगज्जेतेपद ऑस्ट्रेलियाकडे गेले याकडे क्रिकेट रसिकांनी खिलाडू वृत्तीने पाहिले पाहिजे. खेळात हार-जीत व्हायचीच, असे या अग्रलेखात नमूद करण्यात आले आहे.

- Advertisement -

हेही वाचा – आता बिनबुडाचे आरोप करणाऱ्यांची तोंडे बंद होतील, चित्रा वाघ यांनी विरोधकांना सुनावले

क्रिकेटचा विश्वचषक जिंकण्याच्या ईर्षेने भारतीय संघ मैदानात उतरला होता. अहमदाबादचे नरेंद्र मोदी स्टेडियमही खचाखच भरून ओसंडून वाहू लागले होते. देशभरात विजयाची दिवाळी साजरी करण्याची जय्यत तयारी झाली होती. विजयाचा चषक उंचावून अभिवादन घेण्यासाठी ‘मोदी’ स्टेडियमवर स्वतः पंतप्रधान मोदी हजर होते, पण विश्वचषक लढाईत आम्ही पराभूत झालो. मोदी यांना विश्वचषक ऑस्ट्रेलियाच्या हाती सुपूर्द करावा लागला, असे ठाकरे गटाने म्हटले आहे.

या स्पर्धेतील सर्व सामने भारत जिंकला होता व ऑस्ट्रेलियाने पाच सामने गमावले होते, पण अंतिम सामन्यात भारत जिंकला नाही. स्वतःस अजिंक्य, अजेय, महाशक्ती म्हणवून घेणाऱ्या नरेंद्र मोदी यांच्या खास उपस्थितीत भारत पराभूत झाला याचे दुःख भारतीय जनता पक्षाच्या भक्तांना वाटले असेल. कारण भारत विश्वचषक जिंकणार आहे तो फक्त नरेंद्र मोदी यांच्यामुळेच, असा आव आणि ताव हे लोक मारत होते. ‘मोदी है तो मुमकीन है’ हा खेळ त्यांना विश्वचषकात मोदी स्टेडियमवर करायचा होता, पण तसे घडले नाही, असा टोलाही ठाकरे गटाने लगावला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -