घरCORONA UPDATEआज CRPF च्या १३४ जवानांना कोरोनाची लागण

आज CRPF च्या १३४ जवानांना कोरोनाची लागण

Subscribe

सीआरपीएफमधील १ हजार ३८५ जवानांना कोरोनाची लागण

देशातील सर्वात मोठ्या निमलष्करी दलाच्या केंद्रीय राखीव पोलिस दलात (सीआरपीएफ) कोरोना विषाणूने याआधिच शिरकाव केला आहे. आज CRPF च्या १३४ जवानांना कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलं आहे. यामुळे या दलातील कोरोनाबाधितांचा आकडा १ हजार ३०० च्या पार गेला आहे. अधिकाऱ्यांनी बुधवारी याबाबतची माहिती दिली.

सीआरपीएफमधील १ हजार ३८५ जवानांना कोरोनाची लागण झाली आहे. ताज्या आकडेवारीनुसार, दलातील कोरोना विषाणूची लागण झालेल्या एकूण १ हजार ३८५ जवानांपैकी ६९४ जवान बरे झाले आहेत तर ६८२ जवानांवर उपचार सुरू आहेत. या दलात जवळजवळ ३.२५ लाख जवान आहेत आणि हा देशातील मुख्य सुरक्षा दल आहे. गेल्या २४ तासांत सीआरपीएफमध्ये १३४ नव्या रुग्णांची नोंद झाली आहे, असे अधिकाऱ्यानं सांगितलं. या व्यतिरिक्त, २४ जवान बरे झाले आहेत. तर नऊ सीआरपीएफ जवानांचा मृत्यू झाला आहे.

- Advertisement -

सीमा सुरक्षा संबंधित अन्य दोन निमलष्करी दलांमध्ये इंडो-तिबेटियन बॉर्डर पोलिस (आयटीबीपी) आणि सशस्त्र सीमा बाल (एसएसबी) आहेत. आयटीबीपीमध्ये बुधवारी २३ जवानांना कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलं आहे. तर १४ जवान बरे झाले. या दलात आतापर्यंत कोरोना विषाणूची ३५४ प्रकरणे नोंदली गेली आहेत, त्यापैकी २५१ बरे झाले आहेत आणि १०३ जवानांवर उपचार सुरु आहेत. दोन जवानांचा मृत्यू झाला आहे.

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -