राज्यात आज 1812 कोरोना रुग्णांची नोंद, तर एका रुग्णाचा मृत्यू

राज्यात मागील काही दिवसांपासून कोरोना रूग्णांच्या संख्येत वाढ होताना दिसत आहे. गेल्या २४ तासांत राज्यात १८१२ इतक्या नव्या कोरोनाबाधित रूग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर २४ तासांत एकाचा मृत्यू झाला आहे. राज्यात बीए. 5 व्हेरीयंटचे तीन रुग्ण तर बीए. 2.75 चे 16 रुग्ण आढळले आहेत. यामुळे बीए. 5 व्हेरीयंटची रुग्णसंख्या 275 आणि बीए. 2.75 ची रुग्णसंख्या 250 वर गेली आहे.

राज्यातील मृत्यूदर हा 1.83 टक्के इतका झाला. तर आतापर्यंत राज्यामध्ये 78,99,582 कोरोनाबाधित बरे होऊन घरी परतले आहेत. त्यामुळे कोरोना रुग्ण बरे होण्याचं प्रमाण 98.01 टक्के इतकं झालं आहे. राज्यात एकूण 12011 सक्रिय रुग्ण संख्या आहे.

गेल्या काही दिवसांपासून देशात पुन्हा एकदा कोरोनाचे रुग्ण वाढत असून, नेहमीप्रमाणेच केरळ आणि महाराष्ट्र याबाबतीत पुढे आहेत. शुक्रवारच्या तुलनेत शनिवारी नवीन प्रकरणांमध्ये किंचित घट झाली आहे. शुक्रवारी देशात 19406 नवीन कोरोना रुग्ण आढळले होते, तर 19928 लोक बरे झाले होते.

देशात 18 हजार 738 नवीन कोरोनाबाधित रूग्णांची नोंद

देशात कोरोना रूग्णांच्या संख्येत वाढ कायम आहे. गेल्या 24 तासांत 18 हजार 738 रुग्णांना कोरोनाची लागण झाली असून 40 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. शुक्रवारी दिवसभरात 19 हजार 406 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद, तर दिवसभरात 49 रुग्णांचा मृत्यू झाला. देशात 1 लाख 34 हजार 933 सक्रिय कोरोना रुग्ण आहेत. तर देशात 18 हजार 558 रुग्ण कोरोना संसर्गातून बरे झाले आहेत.


हेही वाचा : उत्तराखंडमध्ये बस दरीत कोसळून 39 प्रवाशी जखमी, तर 8 जणांची प्रकृती चिंताजनक