घरदेश-विदेश...आज अमेरिका भारतीयांसोबत; गांधींचा उल्लेख करत बायडेन यांच्याकडून भारतीयांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा

…आज अमेरिका भारतीयांसोबत; गांधींचा उल्लेख करत बायडेन यांच्याकडून भारतीयांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा

Subscribe

अमेरिका आणि भारत भविष्यात जागतिक स्तरावर अनेक आव्हानांना तोंड देण्यासाठी एकत्र काम करत राहतील असा विश्वास सुद्धा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी व्यक्त केला.

आज 15 ऑगस्ट 2022 रोजी भारत स्वातंत्र्याची 75 वर्षे पूर्ण करून 76 व्या वर्षात पदार्पण केले आहे.(independence day) भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव संपूर्ण देशभरातच उत्सहात साजरा करण्यात येत आहे. सर्वच स्तरातून भारताला स्वातंत्र्य दिनानिमित्त शुभेच्छा देण्यात येत आहेत. अशातच अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी सुद्धा भारताच्या अमृतमहोत्सवी स्वातंत्र्य दिनानिमित्त भारताला विशेष शुभेच्छा दिल्या आहेत. अमेरिका आणि भारत कधीही एकमेकांपासून वेगळे ना करता येणारे देश आहेत. अमेरिका आणि भारत एकमेकांचे जोडीदार आहेत असा उल्लेख जो बायडेन(joe biden) यांनी केला. त्याचसोबत अमेरिका आणि भारत(india america) भविष्यात जागतिक स्तरावर अनेक आव्हानांना तोंड देण्यासाठी एकत्र काम करत राहतील असा विश्वास सुद्धा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी व्यक्त केला.

हे ही वाचा – स्वातंत्र्यदिनानिमित्त पंतप्रधान मोदींसह राजकीय नेत्यांना दिल्या देशवासियांना शुभेच्छा

- Advertisement -

‘अमेरिकेत चार बिलियन भारतीय आहेत त्यांच्यासह जगभरातील भारतीय आज स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवी दिन साजरा करत आहे. त्याचबरोबर महात्मा गांधींच्या सत्य आणि अहिंस या शिकवणीसोबत लोकशाहीच्या मार्गाने सुरु असलेली भारताची वाटचाल साजरी करत असताना अमेरिका आज भारतीयांसोबत आहे’. असं जो बायडेन म्हणाले. या संदर्भांत त्यांनी एक पत्रक सुद्धा जरी केले होते. त्या पत्रकाच्या माध्यमातून जो बायडेन यांनी भारताला स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

हे ही वाचा – Independence Day 2022: स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त गुगलचं हे नवीन ‘डुडल’

- Advertisement -

याच संदर्भांत बोलताना जो बायडेन(joe biden) म्हणाले, ‘आम्ही सुद्धा आज सर्वात श्रेष्ठ लोकशाही असलेल्या देशासोबत आमच्या संबंधांची 75 वर्षे साजरी करत आहोत. दोन्ही देशांमधील आणि सेशवासियांमधील हा दृढ विश्वास पाहता भविष्यात हे नाते अधिक घट्ट होणार आहे असा’ विश्वास सुद्धा बायडेन यांनी व्यक्त केला आहे. ‘कायदेशीर मार्गाने कारभार चालावा त्याप्रमाणेच मानवी स्वातंत्र्य आणि प्रतिष्ठा जपली जावी यासाठी भारत आणि अमेरिका या दोन्ही देशांनी धोरणात्मक पद्धतीने काम केले आहे’. असं बायडेन म्हणाले.

हे ही वाचा – इतरांना ओझे वाटणारी भारतातील विविधता हा शक्तीचा अतूट पुरावा; पंतप्रधान मोदींच्या देशवासीयांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा

‘अमेरिकेला अधिक कल्पनात्मक, शक्तीशाली आणि सर्वसमावेशक बनविण्यासाठी अमेरिकेत स्थित असलेल्या भारतीयांचा मोलाचा वाटा आहे’. असा उल्लेखही बायडेन यांनी केला. ‘मला विश्वास आहे की भविष्यात भारत आणि अमेरिका हे दोन्ही देश(india amrerica) कायद्याचं राज्य यावं यासाठी आणि शांतता नांदावी आणि देशाच्या तसेच नागरीकांच्या सुरक्षेसाठी एकत्र काम करतील’ असंही अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन(joe biden) म्हणाले.

हे ही वाचा – स्वातंत्र्यदिनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची पंचप्राण संकल्पांची घोषणा

nidhi pednekar
nidhi pednekarhttps://www.mymahanagar.com/author/nidhipednekar/
मागील ४ वर्षांपासून आकाशवाणीवर मुंबई येथे कंटेन्ट रायटर आणि अँकर म्हणून काम करण्याचा अनुभव, पॉलिटिकल पि.आर. मॅनेजमेंट क्षेत्रात काम करण्याचा अनुभव त्याचसोबत ललित, मनोरंजन, राजकीय घडामोडी, लाईफस्टाईल या विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -