Friday, April 16, 2021
27 C
Mumbai
घर देश-विदेश Holi 2021 : देशात धुलीवंदनाचा उत्साह, महाराष्ट्रात रंगाच्या सणावर निर्बंध तर दिल्लीत...

Holi 2021 : देशात धुलीवंदनाचा उत्साह, महाराष्ट्रात रंगाच्या सणावर निर्बंध तर दिल्लीत मेट्रो बंद

Related Story

- Advertisement -

देशभरात आज रंगाचा उत्सह, म्हणजे होळी, धुळवड साजरा केला जात आहे. रविवारी होळी दहनाने या उत्सवाचा जल्लोष सुरू झाला. आज धुळवड, रंगपंचमीचा साजरी केली जात आहे. मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदाची रंगपंचमीचा सावधानतेने खेळण्याचे आवाहन सरकारकडून करण्यात येत आहे. तर काही राज्यात राज्य सरकारकडून नियमावली जारी करण्यात आली आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सार्वजनिक ठिकाणी रंगपंचमीचा खेळण्यास निर्बंध लागू करण्यात आले आहेत. तर राजधानी दिल्लीत होळी आणि त्यानंतरच्या नवरात्र उत्सवात सार्वजनिक ठिकाणी उत्सव साजरे होणार करण्यात येणार नाहीत. दिल्ली आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने याबाबत आदेश देखील जारी केले आहेत. आज दिल्ली मेट्रो सेवाही दुपारी अडीच वाजेपर्यंत बंद राहणार असल्याचे सांगितले जात आहे.

महाराष्ट्रात अनेक ठिकाणी होळी, धुलिवंदन, रंगपंचमी साजरी करण्यास बंदी घालण्यात आली आहे. यासंदर्भात अनेक ठिकाणच्या प्रशासनाकडून आदेश जारी करण्यात आले आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून होळी आणि रंगपंचमी हा उत्सव खासगी किंवा सार्वजनिक जागेत साजरा करण्यात मनाई करण्यात आली आहे. तसेच जो कोणी या नियमांचे पालन करणार नाही, त्याच्यावर कारवाई करण्यात येईल, असा इशारा मुंबई महापालिकेने दिला आहे. मुंबई महापालिकेकडून याबाबतचे परिपत्रक जारी करण्यात आले आहे.

- Advertisement -

यासह पुण्यात देखील कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या अनुषंगाने पुणे जिल्ह्यात साजरा होणारा रंगपंचमी हा सण एकत्रित येऊन सार्वजनिक ठिकाणी साजरे करण्यास मनाई करण्यात आली आहे. तर ठाणे जिल्ह्यातील कल्याण-डोंबिवलीत वाढत्या कोरोना रुग्णांच्या पार्श्वभूमीवर होळी साजरी करण्यावर महापालिकेने निर्बंध घातले आहेत. तसेच सोसायटीच्या आवारात रंगपंचमी साजरी करण्यावर देखरेख ठेवण्यासाठी चार पथकांची नेमणूक करण्यात आली आहे. कोरोना नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांच्या विरोधात कायदेशीर कारवाई केली जाईल, असे आयुक्तांकडून सांगण्यात आले आहे.

नागपुरमध्ये कोरोनाचा कहर सुरू असून वाढती कोरोना रुग्ण संख्या लक्षात घेता रंगपंचमी हा सण साजरा करण्यावर बंदी घालण्यात आली आहे. नागपुरात ३१ मार्चपर्यंत कडक निर्बंध लागू करण्यात आले असून होळीसाठी कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. तर कोरोना रुग्णांच्या वाढत्या संख्येला आळा घालण्यासाठी नियम अधिक कडक करण्यात आली आहे. होळी, धुलिवंदन, गुड फ्रायडे, ईस्टर संडे साधेपणाने साजरे करण्याचेही आदेश राज्य सरकारकडून देण्यात आले आहे.


राज्यात जमावबंदी; रात्री ८ ते सकाळी ७ पर्यंत निर्बंध लागू

- Advertisement -

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नव्या नियमावलीनुसार राज्यात रात्रीच्या जमावबंदीचे आदेश देण्यात आले आहेत. ज्यामध्ये पाचहून अधिक लोकांना एकत्र येण्यास बंदी असून रात्री ८ ते सकाळी ७ पर्यंत जमावबंदी कायम असणार आहे. यामध्ये नाक आणि तोंड झाकण्यासाठी मास्कचा वापर करणे, सोशल डिस्टन्सिंगचं पालन करणे या नियमांचं पालन अनिवार्य असेल. सार्वजनिक ठिकाणी थुंकण्याऱ्यांस दंड ठोठावण्यात येणार आहे, शिवाय मद्य, पान, गुटखा, तंबाखू या पदार्थांचं सार्वजनिक ठिकाणी सेवन करण्यासही बंदी असेल.

- Advertisement -