घरताज्या घडामोडीToday Gold Silver Price: सोन्याच्या आणि चांदीच्या दरात घसरण; जाणून घ्या आजचे...

Today Gold Silver Price: सोन्याच्या आणि चांदीच्या दरात घसरण; जाणून घ्या आजचे दर

Subscribe

जागतिक स्तरावरी घडमोडी लक्षात घेता आज, गुरुवारी देशातील बाजारात सोन्याच्या किंमतीत किरकोळ घट झाली आहे. आज एमसीएक्सवर सोन्याचे दर ०.०९ टक्के म्हणजेच ४५ रुपयांनी घसरून ४७ हजार ८४७ रुपये प्रति ग्रॅमवर पोहोचले आहे. तर चांदीत ०.२५ टक्क्यांची घसरण होऊन ६७ हजार ४३० रुपये प्रति किलोग्रॅम झाले आहे. गेल्यावर्षीच्या सोन्याच्या उच्चांकी दर ५६ हजार २०० रुपये प्रतिग्रॅमपासून आता सोने ८ हजार ३५३ रुपयांनी कमी झाले आहे.

डेल्टा व्हेरियंटचे प्रकरण वाढत असल्याच्या चिंतेदरम्यान व्यापारी आणि गुंतवणूकदार सतर्क झाले आहेत. गेल्या आठवड्यात भारतात भौतिक सोन्याची मागणी कमजोरी झाली होती. कारण किंमत वाढल्याने किरकोळ खरेदीवर परिणाम झाला होता. असमान जागतिक आर्थिक सुधार आणि डॉलरच्या तुलनेत रुपयात चढउतारमुळे किंमती धातूच्या किंमतीवर परिणाम झाला होता. इंडियन बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशनच्यानुसार हाजिर बाजारात गुरुवारी उच्चतम शुद्धवालं सोनं ४८ हजार ५० रुपये प्रति ग्रॅम विकले. तर चांदी ६८ हजार २४१ रुपये प्रति किलोग्रॅम विकले.

- Advertisement -

जागतिक बाजारात आज सोन्यात ०.१ टक्क्यांची घसरण होऊन १ हजार ८०९.९६ डॉलर प्रति औंस झाले आहे. अमेरिकन सोन्याचे दर ०.१ टक्क्यांनी घसरून १ हजार ८१२.८० डॉलर प्रति औंस झाले आहे. इतर धातूची किंमतीत चांदीत २५.३४ डॉलर प्रति औंस झाले आहे. तर पॅलिडियममध्ये ०.१ टक्क्यांननी घसरून २ हजार ६४४.५८ डॉलर आणि प्लॅटिनम १ हजार ५.५० डॉलर झाले आहे.

गूड रिटर्न्सनुसार, मुंबईत आज २२ कॅरेट सोन्याची किंमत प्रति १० ग्रॅम ४६ हजार ९७० रुपये झाले आहेत. काल २२ कॅरेट सोन्याची किंमत ४६ हजार ९५० रुपये प्रति १० ग्रॅम होते. तसेच २४ कॅरेट सोन्याची किंमत आज ४७ हजार ९७० असून काल ४७ हजार ९५० प्रतिग्रॅम होते. दरम्यान मुंबईत आज चांदीची किंमत ६७ हजार ६०० रुपये प्रति १ किलोग्रॅम झाले आहे. काल चांदी प्रति १ किलोग्रॅम ६८ हजार रुपये होती.

- Advertisement -

हेही वाचा – Covishield पुढे कोरोनाची हार! दोन्ही डोस घेतलेल्यांना ९३ टक्क्यांनी कमी संसर्गाचा धोका


 

Priyanka Shinde
Priyanka Shindehttps://www.mymahanagar.com/author/spriyanka/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सोशल मीडियावर काम करण्याची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -