घरताज्या घडामोडीGold Price Today: आज पुन्हा सोनं झालं महाग, चांदी झाली स्वस्त

Gold Price Today: आज पुन्हा सोनं झालं महाग, चांदी झाली स्वस्त

Subscribe

सोन्याच्या दरात आज, शुक्रवारी पुन्हा वाढ झाली आहे. तर चांदीच्या दरात घट झाली आहे. एचडीएफसी सिक्युरिटीजनुसार, राजधानी दिल्लीत शुक्रवारी सोनं २९४ रुपयांनी वाढून ४७ हजार ४४२ रुपये प्रति १० ग्रॅम झाले आहे. मागील सत्रात सोनं ४७ हजार १४८ रुपये प्रति १० ग्रॅम झाले होते. तसेच आज उलट चांदीच्या दरात १७० रुपयांची घट झाली आहे. ६६ हजार २७४ रुपये प्रति किलोग्रॅम चांदी झाली आहे. मागील सत्रात चांदी ६६ हजार ४४४ रुपये प्रति किलोग्रॅम झाले होते.

आंतरराष्ट्रीय बाजारात सोनं १ हजार ८३० अमेरिकन डॉलर प्रति औंस आणि चांदी २५.५७ डॉलर प्रति औस आहे. एचडीएफसी सिक्युरिटीजचे वरिष्ठ विश्लेषक तपन पटेल म्हणाले की, FOMC बैठकीनंतर डॉलरच्या विक्रीनंतर सोन्याच्या किंमतीत मजबूती झाली. डॉलरचा निर्देशांक चार आठवड्यांच्या निचांकावर आला असून यामुळे सोन्याच्या खरेदीत वाढ झाली.

- Advertisement -

मुंबईत सोन्या, चांदीचे दर वाढले

गोल्ड रिटर्न्सनुसार, मुंबईत काल २२ कॅरेट सोन्याची किंमत प्रति १० ग्रॅम ४७ हजार ७० रुपये होती, तर आज ४७ हजार ३८० रुपये सोनं झालं आहे. तसेच २४ कॅरेट सोन्याची किंमत काल ४८ हजार ७० रुपये प्रति १० ग्रॅम होते, ते आज ४८ हजार ३८० रुपये झाले आहे. तर मुंबईत प्रति किलोग्रॅम चांदीची किंमत काल ६७ हजार २०० रुपये होती. पण आज मुंबईत सोन्याच्या किंमतीसोबत चांदीची किंमत देखील वाढली आहे. शुक्रवारी मुंबईत चांदीची किंमत प्रति किलोग्रॅम ६८ हजार २०० रुपये झाली आहे.

Priyanka Shinde
Priyanka Shindehttps://www.mymahanagar.com/author/spriyanka/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सोशल मीडियावर काम करण्याची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -