घरदेश-विदेशtoday gold rate: सोन्याचा दर पून्हा ५ हजारांची वाढ, चांदी झाली स्वस्त

today gold rate: सोन्याचा दर पून्हा ५ हजारांची वाढ, चांदी झाली स्वस्त

Subscribe

गुंतवणूकदार भांडवली बाजारातून पैसा काढून घेत असल्याने सोन्याच्या किंमतींवर परिणाम होताना दिसतोय.

देशात कोरोना विषाणूचा हैदोस सुरु असून आरोग्य व्यवस्थेवर ताण निर्माण झाला आहे. रुग्ण वाढत असल्याने अनेक राज्यांमध्ये पून्हा लॉकडाऊन जाहीर करण्यात आला. दरम्यान येत्या काही दिवसात रुग्णसंख्या आटोक्यात न आल्यास संपूर्ण देशात लॉकडाऊनची शक्यता वर्तवली जात आहे. याचा परिणाम भांडवली बाजारावरही दिसून येत आहे. कोरोनाच्या भीतीने गुंतवणूकदार भांडवली बाजारातून पैसा काढून घेत असल्याने सोन्याच्या किंमतींवर परिणाम होताना दिसतोय. गेल्या काही दिवसात ४२ हजारांवर पोहचलेल्या सोन्याच्या किंमतींनी पून्हा ५ हजार रुपयांच्यावर उसळी घेतली आहे. तसेच गेल्या दोन दिवसांपासूनही सोन्याच्या दरात सतत वाढ होत आहे.

सोमवारी कमॉडिटी बाजारातही सोने, चांदीच्या मोठी वाढ झाल्याचा पाहायला मिळाले. सोने ४८००० हजारांवर पून्हा जात आहे. तर एमसीएक्समध्येही सोन्याचे दर ४७५६९ रुपयापर्यंत पोहचले असून एका दिवसात सोन्याचे दर २३० रुपयांनी वाढले आहेत. चांदीचे एक किलोचा दर ६८४३५ रुपये असून यात २४९ रुपयांची घसरण झाली आहे.

- Advertisement -

दरम्यान Good returns या वेबसाईटवरील सोने , चांदीचे आजचे दर दाखवण्यात आले आहेत. मुंबईत २४ कॅरेट सोने खरेदीसाठी मुंबईकरांना ४६०२० रुपये मोजावे लागणार आहेत तर २२ कॅरेट सोन्यासाठी ४५०२० रुपये मोजावे लागणार आहेत. यात दिल्लीत २४ कॅरेट सोन्याचा दर ५०४३० रुपयांवर पोहचला आहे तर २२ कॅरेट सोन्याचा दर ४६२८० रुपये झाला आहे. यात चेन्नईत आज २४ कॅरेट सोन्याचा दर ४८६५० इतका झाला आहे तर २२ कॅरेट सोन्याचा दर ४४६०० रुपयांवर पोहचला आहे. दरम्यान कोलकात्त्यात २४ कॅरेट सोन्याचा दर ४९०२० रुपये इतका आहे तर २२ कॅरेट सोने ४६३२० रुपये झाले आहे. त्यामुळे दिल्लीत सध्या सोन्याचे भाव सर्वाधित आहेत. त्याखोलाखाल कोलकत्ता, चेन्नई आणि मुंबईचा नंबर लागतो.

जागतिक बाजारपेठेतही स्पॉट गोल्डच्या दरात ०.१ टक्क्यांनी वाढ झाी आहे. त्यामुळे सोन्याचा दर प्रति औंस १७७७.३३ डॉलर झाला आहे. तर य़ूएस गोल्ड फ्युचरच्या भावातही ०.२ इतकी मोठी घसरण झाली आहे. परिणाम भारतातील सोने व्यापारावरही याचा परिणाम दिवस आहे.

- Advertisement -

 

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -