Friday, June 2, 2023
27 C
Mumbai
घर देश-विदेश अग्निवीरांसाठी आजचा दिवस महत्त्वाचा : पहिली तुकडी नौदलात होणार दाखल, INS चिल्कावर...

अग्निवीरांसाठी आजचा दिवस महत्त्वाचा : पहिली तुकडी नौदलात होणार दाखल, INS चिल्कावर पासिंग आऊट परेड

Subscribe

नवी दिल्ली : भारतीय लष्करासाठी आजचा दिवस ऐतिहासिक आहे, कारण अग्निवीरांची पहिली तुकडी नौदलात दाखल होणार आहे. या पहिल्या तुकडीच्या स्वागतासाठी आयएनएस चिल्कावर पासिंग आऊट परेड पार पडणार असून या सोहळ्याला नौदल प्रमुख ॲडमिरल आर. हरी कुमार यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. तिन्ही सैन्य दलासाठी जून 2022 मध्ये अग्निपथ योजनेची घोषणा करण्यात आली होती.

माध्यमातील वृत्तानुसार प्रशिक्षण घेत असलेल्या 2600 अग्निवीरांची तुकडी आज नौदलात सामील होणार असून यामध्ये 273 महिला अग्निवीरांचा समावेश आहे. आयएनएस चिल्कावर होणाऱ्या पासिंग आऊट परेडमध्ये हे प्रशिक्षित अग्निवीर नौदलात रुजू होतील.

- Advertisement -

अग्निवीरांची पहिली तुकडी नौदलात दाखल होत असताना आज होणारी पासिंग आऊट परेड अनेक अर्थाने खास ठरणार आहे. पारंपारिक पद्धतीने पासिंग आऊट परेड सकाळी आयोजित केली जाते, पण भारतीय सशस्त्र दलाच्या इतिहासात पहिल्यांदाच ही परेड सूर्यास्तानंतर आयोजित करण्यात आली आहे. आयएनएस चिल्का नौदलाच्या प्रमुख प्रशिक्षण तळांपैकी एक आहे. पासिंग आऊट परेडनंतर या अग्निवीरांना नौदलाच्या युद्धनौका आणि समुद्रातील इतर लष्करी तळांवर तैनात केले जाणार आहे.

- Advertisement -

अग्निपथ योजनेअंतर्गत अग्निवीरांची भरती
संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि तिन्ही लष्कर प्रमुखांनी गेल्या वर्षी 14 जून 2022 रोजी अग्निपथ योजनेची घोषणा केली होती. भारत सरकारच्या पॅन-इंडिया मेरिट-आधारित अग्निपथ भरती योजनेअंतर्गत ही योजना सुरु करण्यात आली. या संधीचा फायदा घेत नौदलाने महिला अग्निवीरांच्या प्रवेशालाही परवानगी दिल्यामुळे आज 273 महिला अग्निवीरांसह सुमारे 2,600 अग्निवीरांना भारतीय नौदलात भरती करण्यात आले आहे. त्यांचे प्रशिक्षण नोव्हेंबर 2022 मध्ये आयएनएस चिल्का येथे पूर्ण झाले असून आज त्यांची पासिंग आऊट परेड पार पडणार आहे.

- Advertisment -