भारतीयांसह जगाच्या आशा, अपेक्षांसह अवकाशात झेपावलेलं चांद्रयान-3 साठी आजचा महत्त्वाचा दिवस आहे. चांद्रयान-3 हे आज दोन भागात विभागलं जाणार आहे. विक्रम लँडर हे प्रोपल्शन मॉड्यूलपासून वेगळं करण्यात येणार आहे. चांद्रयान-3 मोहिमेतील हा अत्यंत महत्त्वाचा टप्पा आहे. ( Today is an important day for Chandrayaan 3 The Vikram lander will separate from the propulsion module )
14 जुलै रोजी भारताचं चांद्रयान-3 हे चंद्राच्या दिशेनं झेपावलं आहे. मिशन ऑपरेशन्स कॉम्प्लेक्स, इस्रो टेलिमेट्री, ट्रॅकिंग अँड कमांड नेटवर्क, बंगळुरूकडून हे यान लॉन्च करण्यात आलं असून येथूनच कंट्रोल केलं जात आहे. मॉड्यूलपासून लँडर वेगळा झाल्यानंतर चांद्रयान-3 चं वजन 3900 वरून 2100 किलोवर येणार आहे. चंद्रावर विक्रम लँडर उतरल्यावर काही तासांनी लँडरच्या पोटातून प्रज्ञान नावाचा रोव्हर बाहेर पडत चांद्र भूमिवर संचार करणार आहे.
मॉड्युलपासून लँडर वेगळा झाल्यानंतर चांद्रयान-3 चंद्रपासून 100 किलोमीटरच्या कक्षेत पोहोचणार आहे. 23 ऑगस्ट रोजी चांद्रयान-3 चे चंद्रावर सॉफ्ट लँडिंग केलं जाणार आहे. लँडिंग करण्यापूर्वी प्रोपल्शन मॉड्यूल वेगळं झाल्यानंतर यानाचे वजन 2100 किलो इतकं होणार आहे.
( हेही वाचा: जय हो…चांद्रयान-3 प्रवास पूर्ण करीत पोहचले चंद्राच्या पृष्ठभागाच्या जवळ; आता पुढे काय? )
प्रोपल्शन मॉड्यूलचे वजन 2148 किलो इतके असून लँडर मॉड्यूलचे वजन 1752 किलो आहे. तर, रोव्हर प्रज्ञानचे वजन केवळ 26 किलो आहे. प्रोपल्शन मॉड्यूल, लँडर आणि रोव्हर यामुळे सध्या चांद्रयान-3 चे एकूण वजन जवळपास 3 हजार 900 किलो इतके आहे.
इस्रोला कशी मिळणार माहिती?
17 ऑगस्टला प्रॉपल्शन मॉड्यूलपासून लँडिंग मॉड्यूल वेगळं होईल. त्यानंतर लँडिंग मॉड्युलला चंद्राच्या आणखी जवळ नेण्यासाठी थ्रस्टर ऑन केले जातील. त्यानंतर 20 ऑगस्टला सुद्धा असचं केलं जाईल. लँडरवर ही प्रोसस सुरू असताना प्रॉपल्शन मॉड्युलच चंद्राच्या 100 किमी. कक्षेत भ्रमण सुरु राहिलं. सॉफ्ट लँडिगची प्रोसेस पूर्ण झाल्यानंतर रोव्हर माहिती लँडरकडे देईल. त्यानंतर ती माहिती प्रॉपल्शन मॉड्युलकवरी इस्रोला मिळेल.