घरदेश-विदेशकर्नाटकातील प्रचाराचा आजचा शेवटचा दिवस, दिग्गज नेत्यांच्या होणार सभा

कर्नाटकातील प्रचाराचा आजचा शेवटचा दिवस, दिग्गज नेत्यांच्या होणार सभा

Subscribe

कर्नाटक राज्यात विधानसभा निवडणुकांचे बिगूल वाजल्यापासून राजकीय पक्षांनी कंबर कसली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासहित राहुल गांधी, प्रियंका गांधी यांनी प्रचाराला हजेरी लावली. परंतु आज या प्रचाराच्या तोफा थंड होणार आहेत.

कर्नाटक राज्यात विधानसभा निवडणुकांचे बिगूल वाजल्यापासून राजकीय पक्षांनी कंबर कसली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासहित राहुल गांधी, प्रियंका गांधी यांनी प्रचाराला हजेरी लावली. परंतु आज या प्रचाराच्या तोफा थंड होणार आहेत. (Today is last day of campaigning in Karnataka) त्यामुळे मतदारांना आकर्षित करण्यासाठी नेत्यांकडून आज शेवटचा प्रयत्न करणार आहेत. यंदाची कर्नाटक विधानसभा निवडणूक ही अनेक कारणांनी चर्चेचा विषय ठरली आहे. महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद असो, महाराष्ट्रातील नेत्यांचा मराठी उमेदवारांच्या विरोधातील प्रचार असो अशा एक ना अनेक कारणामुळे या विधासभा निवडणुकांकडे सर्वांचेच लक्ष लागलेले आहे. सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे नेहमी प्रमाणे कर्नाटकातले मतदार एकाच पक्षाची सत्ता कायम न ठेवता दुसऱ्या पक्षाच्या हाती सत्ता देतील की भाजप कर्नाटकातील 38 वर्षे जुनी परंपरा मोडीत काढण्यासाठी यशस्वी ठरतील.

भाजपला या निवडणुकीत पराभूत करण्यासाठी काँग्रेस पक्षाकडून जोरदार प्रयत्न करण्यात येत आहे. जर का काँग्रेसने या निवडणुकीत भाजपचा पराभव केला तर यामुळे भाजपला याचा फार मोठा फटका बसू शकतो. सध्या कर्नाटकातील राजकीय वातावरण तापलेले पाहायला मिळत आहे. या विधानसभा निवडणुकीत भाजप विरुद्ध काँग्रेस ही महत्त्वाची लढत होणार आहे. पण धर्मनिरपेक्ष जनता दल अर्थात जेडीएस हा पक्ष माजी पंतप्रधान एच. देवगौडा यांच्या नेतृत्वात निवडणूक लढत आहे.

- Advertisement -

हेही वाचा – कर्नाटक निवडणूक, सोशल मीडियावर जोक्सचा पाऊस

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कर्नाटकात विशेष लक्ष केंद्रित केलेले पाहायला मिळाले आहे. त्यांनी आतापर्यंत तब्बल 18 सार्वजनिक सभा आणि सहा रोड शो घेतलेले आहेत. भाजपकडून राष्ट्रीय समस्या, केंद्रातील योजना, केंद्र सरकारची कामगिरी, हिंदुत्व या मुद्द्यांना लक्ष करून निवडणुकीचा प्रचार केला आहे. तर दुसरीकडे काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, काँग्रेस नेते राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यांच्या नेतृत्वात पक्षाने जोरदार प्रचार केला आहे. तर सोनिया गांधींनी देखील या प्रचाराला हजेरी लावलेली पाहायला मिळाली. काँग्रसने स्थानिक समस्यांवर प्रकाश टाकत निवडणुकांचा प्रचार केला आहे. ज्यामुळे स्थानिक मुद्दे की केंद्रीय मुद्दे यांपैकी कोणत्या मुद्द्यांचा विचार करून मतदार कर्नाटकाचे भविष्य ठरवणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

- Advertisement -

दरम्यान, काँग्रेससाठी, भाजपकडून सत्ता हिसकावून घेणे हे मनोबल वाढवणारे आणि 2024 च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी भाजपच्या विरोधात मुख्य विरोधी पक्ष म्हणून आपले स्थान बळकट करण्यासाठी महत्त्वाचे ठरणार आहे. कर्नाटक विधानसभा जिंकल्यास काँग्रेसला मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि राजस्थान या राज्यांमध्ये या वर्षाच्या अखेरीस होणाऱ्या निवडणुकीमध्ये आपली ताकद दाखवण्यासाठी मनोबल मिळण्याची शक्यता आहे.

तर आज कर्नाटकातील निपाणी मतदारसंघात प्रचाराच्या शेवटच्या दिवशी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांची तोफ धडाडणार आहे. राजीनामा नाट्यावर पडदा टाकल्यानंतर शरद पवार यांच्या प्रत्येक विधानाकडे सगळ्यांचेच लक्ष असते. त्यामुळे शरद पवार आज निपाणीमध्ये नेमके काय बोलतात हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. तर यंदा काँग्रेसचं कर्नाटकात सत्ता स्थापन करणार असल्याचा दावा याआधीच शरद पवार यांच्याकडून करण्यात आलेला आहे. तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भाजपच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी कर्नाटकात हजेरी लावल्याचे पाहायला मिळाले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -