Eco friendly bappa Competition
घर देश-विदेश आज देशातील 2 दिग्गज उद्योगपतींचा जन्मदिवस; जाणून घ्या कशाप्रकारे केली व्यवसायाची सुरुवात

आज देशातील 2 दिग्गज उद्योगपतींचा जन्मदिवस; जाणून घ्या कशाप्रकारे केली व्यवसायाची सुरुवात

Subscribe

भारताचे 2 दिग्गज उद्योगपती रतन टाटा आणि धीरुभाई अंबानी या दोघांचाही आज वाढदिवस आहे. रतन टाटा यांचा आज 85 वा वाढदिवस आहे. तर दिवंगत धीरुभाई अंबानी यांचा आज 90 वा वाढदिवस आहे. रतना टाटा यांचा जन्म 28 डिसेंबर 1937 रोजी मुंबईमध्ये झाला होता. तर धीरुभाई अंबानी यांचा जन्म 28 डिसेंबर 1932 साली झाला होता. भारतातील हे दोनही दिग्गज एक यशस्वी उद्योगपती आहेत.

सध्या भारतात मीठापासून ते सॉफ्टवेअरपर्यंत सगळीकडे टाटा उद्योग समूह आहेत तर रिलायन्स दूरसंचारपासून ते पेट्रोलियमपर्यंत सगळीकडे अंबानी समूहाचा डंका आहे. दिवंगत धीरुभाई अंबानी यांचा जन्म एका गरीब कुटुंबामध्ये झाला होता. ते एके काळी 300 रुपयांची नोकरी करत होते. मात्र जेव्हा त्यांचे निधन झाले तेव्हा त्यांच्याकडे 62 हजार करोड रुपयांची संपत्ती होती. तसेच रतन टाटा यांचा जन्म श्रीमंत घरात झाला परंतु त्यांचे बालपण फार चांगले नव्हते.

- Advertisement -

गरीबीत गेले धीरुभाई यांचे बालपण
धीरुभाई अंबानी लहानपणी फुचपाथवर फळं विकायचे. तरुणपणी त्यांना 300 रुपये महिना पगाराची नोकरी मिळाली. त्यांची मेहनत आणि काम पाहून 2 वर्षानंतर मालकाने त्यांना मॅनेजर बनवलं. तेव्हा त्यांना व्यवसाय करण्याची युक्ती सुचली. कमी पगार असूनही ते चहा पिण्यासाठी 5 स्टार हॉटेलमध्ये जायचे. जेव्हा त्यांना यामागचे कारण विचारण्यात आले तेव्हा ते म्हणाले की, तिथे गेल्यावर मोठ-मोठ्या उद्योपतींची व्यवसाय करण्याची युक्ती त्यांना सुचते. 1950 साली त्यांनी आपल्या एका भावासोबत रिलायंस कमर्शियल कारपोरेशन कंपनी अंतर्गत पॉलिएस्टर धागे आणि मसाल्यांच्या के आयात-निर्यातीचा व्यवसाय सुरु केला. तेव्हाच त्यांच्या रिलायंस कंपनीला सुरुवात झाली. 1965 साली त्यांचा भाऊ या व्यवसायातून बाहेर पडला. त्यामुळे धीरुभाई अंबानी यांनी मागे वळून न पाहता व्यवसायात आणखी वाढ केली.

आजीने केला रतन टाटा यांचा सांभाळ 
आई-वडीलांच्या आपापसातील मतभेदांमुळे त्यांचा सांभाळ त्यांच्या आजीने केला. वयाच्या 10 व्या वर्षापासून त्यांच्या आजीने त्यांना सांभाळले. वयाच्या 25 व्या वर्षापासून रतन टाटा यांच्या कारकिर्दीची सुरुवात झाली. 1959 मध्ये ते आर्किटेक्चर आणि स्ट्रक्चरल इंजीनियरिंगचे शिक्षण घेण्यासाठी कॉर्नेल विश्वविद्यालयात गेले. परदेशातून भारतात परतण्यापूर्वी 1962 मध्ये त्यांनी लॉस एन्जेलिसमध्ये Jones and Emmons साठी काम केले. 1962 मध्ये ते टाटा समूहात सहभागी झाले आणि त्यावेळी त्यांचे काम जमशेदपुरमध्ये टाटा स्टील डिलीडनसोबत काम करण्याचे होते. 1775 मध्ये त्यांनी हार्वर्ड बिजनेस स्कूलकडून मॅनेजमेंटचा कोर्स केला. 1991 साली ते टाटा ग्रुपचे चेअरमन झाले होते. रतन टाटा यांनी भारताला पहिली स्वदेशी कार बनवून दिली. 1998 मध्ये टाटा समुहाकडून इंडिका ही पहिली स्वदेशी कार ऑटो एक्स्पोमध्ये सादर करण्यात आली होती. रतन टाटा यांना बरेच छंद आहेत. त्यातलाच एक छंद आणि आवड म्हणून त्यांनी 2007 मध्ये F-16 फाल्कन (F-16 Falcon) उडवलं होतं. असं करणारे ते पहिले भारतीय ठरले होते.


- Advertisement -

हेही वाचा :

Happy Birthday Ratan Tata : आईने नाही तर ‘या’ स्त्रीने केला रतन टाटांचा सांभाळ

shivani patil
shivani patilhttps://www.mymahanagar.com/author/shivanipatil/
मनोरंजन, भक्ती, लाईफस्टाईल या विषयांवर लिखाणाची आवड, वाचणाची आवड
- Advertisment -