घरदेश-विदेशकर्नाटकात कुमारस्वामींचा आज शपथविधी सोहळा

कर्नाटकात कुमारस्वामींचा आज शपथविधी सोहळा

Subscribe

जनता दल सेक्युलर(जेडीएस)चे नेते एच. डी. कुमारस्वामी आज संध्याकाळी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत. तर, काँग्रेसचे जी. परमेश्वर हे उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतील. २०१९च्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पहिल्यांदाच विरोधकांची भाजपविरोधात एकजूट दिसणार आहे. शपथविधी सोहळ्याला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, डीएमकेचे नेते एम. के. स्टॅलिन , पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, आन्ध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री अखिलेश यादव, भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे नेते सीताराम येचुरी यांच्यासह अनेक दिग्गज उपस्थित राहणार आहेत.

‘हे तर आव्हान’

- Advertisement -

आघाडी सरकार चालवणे हे आव्हान असल्याची कबुली एच. डी. कुमारस्वामी यांनी दिली आहे. उपमुख्यमंत्रीपद काँग्रेसच्या दोन आमदारांकडे विभागून देण्याची काँग्रेसची योजना होती. पण, जेडीएस त्यास राजी नसल्याचे कळतेय. काँग्रेस-जेडीएसच्या नेत्यांची सत्तावाटपासंदर्भात मंगळवारी संध्याकाळी बैठक झाली. यानंतर कर्नाटक काँग्रेसचे सरचिटणीस के. सी. वेणूगोपाल यांनी ३४ खात्यांपैकी २२ खाती काँग्रेसकडे, तर मुख्यमंत्रिपदासह १२ खाती जेडीएसकडे असतील, असं सांगितलं आहे. कुणाकडे कोणते खाते असेल, याचा निर्णय बहुमत सिद्ध झाल्यावर घेतला जाणार आहे.

देवेगौडा काय म्हणाले?

- Advertisement -

दरम्यान, काँग्रेसला मुख्यमंत्रीपदाची ऑफर दिली होती पण, काँग्रेसने ती नाकाल्याचा खुलासा माजी पंतप्रधान एच. डी. देवेगौडा यांनी केला आहे. एका वृत्तवाहिनीशी ते बोलत होते. शिवाय, काँग्रेस-जेडीएस सरकार पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करेल, असा विश्वास देखील त्यांनी व्यक्त केला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -