घरदेश-विदेशtoday petrol diseal price ... देशात एका महिन्यात सहाव्यंदा इंधन वाढ...जाणून घ्या...

today petrol diseal price … देशात एका महिन्यात सहाव्यंदा इंधन वाढ…जाणून घ्या पेट्रोल डिझेलचा आजचा दर

Subscribe

देशात एका महिन्यात सलग सहाव्यांदा पेट्रोल- डिझेलच्या दरात वाढ झाली आहे. ज्यामुळे अनेक राज्यांमध्ये पेट्रोलचा दराने शंभरी पार केली आहे. पेट्रोलच्या दरात प्रत्येक लिटरमागे 27 पैशांची वाढ झाली आहे तर एक लिटर डिझेलच्या किंमतीत 30 पैशांनी वाढ झाली आहे. दरम्यान दिल्लीत आज प्रति लिटर पेट्रोलचा दर ९१. ८ रुपये असून डिझेल ८२. ३६ रुपयांवर पोहचले आहे. त्यामुळे ४ मेपासून ते आत्तापर्यंत इंधन दरवाढीने उच्चांक गाठला आहे. मुंबईत पेट्रोलचा दर प्रति लिटर ९८.१२ रुपयांवर पोहचला आहे. तर डिझेलने ८९.४७ रुपये ओलांडले आहेत. राजस्थान, मध्य प्रदेश आणि महाराष्ट्रातीला काही जिल्ह्यांमध्ये इंधन दराने शंभरीचा आकडा पार केला आहे. फेब्रुवारीच्या मध्यात काही ठिकाणी पेट्रोलने शंभरी पार केली होती. आता दरवाढ सुरू झाल्याने पेट्रोलने पुन्हा शंभरी गाठली आहे. आठवडाभरात पेट्रोलच्या दरात प्रतिलिटर 1.44 रुपये आणि डिझेलच्या दरात 1.33 रुपये वाढ झाली आहे.

राजस्थानमधील श्रीगंगानगर जिल्ह्यात देशातील सर्वात महाग पेट्रोल- डिझेल सर्वात महाग विकले जात आहे. या जिल्हात पेट्रोलचा प्रतिल लिटर दर हा तब्बल १०२.७ रुपये आहे तर डिझेलचा दर ९५.०६ रुपये इतका आहे. तर जैलममेर आणि बीकानेरमध्येही पेट्रोलचा दराने शंभरचा आकडा पार केला आहे. यात बारमेर जिल्ह्यात इंधन दर ९२,८२ रुपयांवर पोहचल्याने याभागातही इंधन दराचा भडका उडाला आहे. तर शहडोलमध्ये पेट्रोल १०२ रुपये, रिवा १०२.४ रुपये, छिंदवाडा १०१ रुपये आणि बालाघाटमध्ये १०१.९८ रुपयांनी पेट्रोलचे दर महागले आहेत. भोपाळ आणि इंदौरमध्येही पेट्रोल-डिझेलच्या किंमतींमध्ये वाढ झाली असून पेट्रोल अनुक्रमे ९९.९ रुपये आणि ९९.८३ रुपयांनी वाढले आहे.

- Advertisement -

महाराष्ट्रातील परभणी, नांदेडमध्ये सर्वाधिक महाग पेट्रोल

महाराष्ट्रातील सर्वात महाग पेट्रोल हे परभणी आणि नांदेडमध्ये पाहायला मिळत आहे. परभणीमध्ये पेट्रोलचा दर हा ९९ वर त्यापाठोपाठ नांदेडमध्येही पेट्रोलची किंमती शंभरीवर पोहचली आहे. त्याशिवाय परभणीत डिझेलची विक्री सर्वाधिक दराने होत आहे. परभणी शहरात डिझेलचा दर ८९ रुपये इतका आहे.

दरम्यान देशात पश्चिम बंगालसह अन्य पाच राज्यांचा निवडणुका संपताच गेल्या सलग पाच दिवसांपासून पुन्हा इंधन दरात वाढ करण्यास सुरुवात केली आहे. या निवडणुकांची मत मोजणी झाल्यानंतर लगेचच तेल कंपन्यांनी आंतरराष्ट्रीय तेलाच्या बाजाराच्या ट्रेंडच्या अनुषंगाने किरकोळ किमतींमध्ये मोठी वाढ केली. प्रत्येक राज्यांमध्ये इंधनाचे दर वेगवेगळे आहेत कारण प्रत्येक राज्य़ात अतिरिक्त वाहतूकीवरील कर (व्हॅट) हा वेगवेगळा आकारला जातो. राजस्थानमध्ये सर्वाधिक वाहतुक कर (व्हॅट) आकारला जात असून त्यापाठोपाठ मध्य प्रदेश राज्याचा नंबर लागलो. देशात सध्या कोरोना विषाणुने हाहाकार माजवला असतानाच केंद्राने इंधनाचे दर स्थिर ठेवण्यावर भर देण्याऐवजी वाढतच असल्याने विरोधी पक्षांनी आता टीका करण्यास सुरुवात केली आहे. पेट्रोलच्या किरकोळ विक्री किंमतीच्या सुमारे ६० टक्के आणि डिझेलच्या ५४ टक्क्यांवर केंद्रीय आणि राज्य सरकार कर आकारत आहे.

- Advertisement -

Corona in India: देशात कोरोना संसर्गाचा वेग मंदावला; गेल्या २४ तासात ३.२९ लाख नवे रूग्ण


 

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -