घरताज्या घडामोडीPetrol-Diesel Price Today: सलग दुसऱ्या दिवशी पेट्रोल-डिझेल महागले, जाणून घ्या आजचे दर

Petrol-Diesel Price Today: सलग दुसऱ्या दिवशी पेट्रोल-डिझेल महागले, जाणून घ्या आजचे दर

Subscribe

देशात सलग दुसऱ्या दिवशी पेट्रोल-डिझेल महागले आहे. तेल कंपन्यांनी आज पुन्हा एकदा पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत वाढ केली आहे. भारतीय बाजारात पेट्रोलची किंमत २७ पैसे प्रति लीटर आणि डिझेलची किंमत २३ पैसे प्रति लीटरने महागले आहे. तेल किंमतीत बदल झाल्यानंतर शनिवार दिल्लीत पेट्रोलची किंमत ९६.१२ रुपये प्रति लीटर झाले असून डिझेल ८६.९८ रुपयेवर प्रति लीटर पोहोचले आहे.

जाणून घ्या प्रमुख शहरात पेट्रोल-डिझेलच्या किंमती

शहर                    पेट्रोल किंमत                 डिझेल किंमत
दिल्ली                     ९६.१२                        ८६.९८
कोलकाता                  ९६.०६                       ८९.८३
मुंबई                        १०२.३०                      ९४.३९
चेन्नई                        ९७.४३                       ९१.६४

- Advertisement -

शुक्रवारी तेल कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलचे दरात वाढ केली होती. पेट्रोलची किंमत २९ पैसे प्रति लीटर तर डिझेलच्या किंमतीमध्ये २८ पैसे प्रति लीटर वाढ केली होती. त्यानंतर दिल्लीमध्ये पेट्रोलची किंमत ९५.८५ रुपयांवर प्रति लीटर आणि डिझेलची किंमत ८६.७५ रुपयांवर प्रति लीटर पोहोचले.

४ मेनंतर आतापर्यंत म्हणजेच १२ जूनपर्यंत २३ वेळा इंधन किंमतीत वाढ झाली आहे. इंधन दर वाढीमुळे देशभरात पेट्रोल आणि डिझेल दरात रेकॉर्ड मोडला आहे. ४ मेपासून ११ जूनपर्यंत २२ वेळा इंधर दर वाढल्यामुळे पेट्रोल ५.४५ रुपये लीटर आणि डिझेल ६.०२ रुपये लीटर महागले आहे.

- Advertisement -

सहा राज्यांसह केंद्रशासित प्रदेशांमध्ये पेट्रोलची किंमत १०० रुपये पार गेली आहे. यामध्ये राजस्थान, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि लडाख यांचा समावेश आहे.


हेही वाचा – Corona Second Waveमध्ये ७१९ डॉक्टर्स दगावले; IMAने जारी केले आकडे


Priyanka Shinde
Priyanka Shindehttps://www.mymahanagar.com/author/spriyanka/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सोशल मीडियावर काम करण्याची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -