घरताज्या घडामोडीCorona Vaccine तयार करणाऱ्या ७ कंपन्यांनाशी आज पंतप्रधान मोदी साधणार...

Corona Vaccine तयार करणाऱ्या ७ कंपन्यांनाशी आज पंतप्रधान मोदी साधणार संवाद

Subscribe

२१ ऑक्टोबर रोजी भारताने पूर्ण केलेला १०० कोटी लसीकरणाचा टप्पा ही भारतासाठी ऐतिहासिक कामगिरी

भारताने नुकताच १०० कोटींच्या लसीकरणाचा विक्रमी टप्पा पार केला आहे. याच पार्श्वभूमीवर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (Pm MOdi) कोरोना विरोधी लशी तयार करणाऱ्या देशातील विविध सात कंपन्याशी शनिवारी दुपारी ४ वाजता संवाद साधणार आहेत. पंतप्रधान मोदी कोरोना विरोधी लशी तयार करणाऱ्या भारतातील सीरम इंन्स्टिट्यूट ऑफ इंडिया, भारत बायोटेक, डॉ.रेड्डीज लॅबोरोटरी, झायडस कॅडिला, बायोलॉडिकल ई, जेन्वोवा बायोफार्मा आणि पॅनेसिया बायोटेक या कंपन्यांच्या प्रतिनिधींशी सवांद साधणार आहेत. देशातील विक्रमी लसीकरणाचा टप्पा पार पडल्यानंतर पंतप्रधान मोदींनी सर्व देशवासियांचे आभार मानले होते.

- Advertisement -

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार भारतात आतापर्यंत १०१.३० कोटी लोकांचे लसीकरण पूर्ण झाले आहे. २१ ऑक्टोबर रोजी भारताने पूर्ण केलेला १०० कोटी लसीकरणाचा टप्पा ही भारतासाठी एक ऐतिहासिक कामगिरी ठरली आहे. जगभरातून यासाठी भारताचे कौतुक आणि अभिनंदन करण्यात येत आहे. देशात शंभर कोटींचे लसीकरण पूर्ण झालेल्या व्यक्तींमध्ये ७५ वर्षावरील नागरिकांची संख्या सर्वाधिक आहे. जवळपास ३१ टक्के लोकांनी कोरोना विरोधी लशीचे दोन्ही डोस घेतले आहेत. तसेच ९ राज्य आणि केंद्रशासित प्रदेशातील सर्व नागरिकांनी कोरोना लसीचा एक डोस घेतला आहे.

देशात १६ जानेवारीपासून कोरोना विरोधी लसीकरण मोहिमेला सुरुवात करण्यात आली. लसीकरणाच्या पहिल्या टप्प्यात आरोग्य कर्मचाऱ्यांचे लसीकरण करण्यात आले त्यानंतर ६० वर्षांवरील नागरिकांच्या लसीकरणाला परवानगी देण्यात आली. त्यानंतर ४५ वर्षांवरील तसेच १८ वर्षांवरील नागरिकांचे लसीकरण करण्यात आले आणि आता देशातील लहान मुलांच्या लसीकरणाला सुरुवात करण्यात आली आहे.

- Advertisement -

हेही वाचा – १०० कोटी लसपूर्तीसाठी मोदींकडून देशवासीयांचे कौतुक, मास्क वापरावर म्हणाले…

Minal Gurav
Minal Guravhttps://www.mymahanagar.com/author/minal/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रीय. मनोरंजन,लाईफ स्टाईल विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -