घरताज्या घडामोडीPM Modi In Prayagraj: पंतप्रधान नरेंद्र मोदी आज उत्तर प्रदेशच्या लाखो महिलांना...

PM Modi In Prayagraj: पंतप्रधान नरेंद्र मोदी आज उत्तर प्रदेशच्या लाखो महिलांना गिफ्ट देणार

Subscribe

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज संगमनगरीमधील मातृशक्तीच्या महाकुंभमध्ये सहभागी होणार आहेत. परेड मैदानमध्ये आयोजित केलेल्या या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी बचत गटातील (SHG – स्वयं सहायता समूह) महिलांसोबत संवाद साधणार आहेत. यादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी उत्तर प्रदेशच्या महिला गिफ्ट देणार आहेत. म्हणजेच एसएचीजीच्या बँक खात्यात एक हजार कोटी रुपये मोदी टाकतील आणि यामुळे १६ लाख महिलांना मदत मिळणार आहे. याशिवाय पंतप्रधान मोदी आत्मनिर्भर होत असलेल्या महिलांचा सन्मान करतील. या कार्यक्रमात अडीच लाखांहून अधिक महिला उपस्थितीत राहणार आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे विशेष विमान जवळपास पावणे एक वाजता बम्हरौलीवर उतरेल. तिथून हेलिकॉप्टरमधून परेड मैदानावर मोदी जातील. यादरम्यान पंतप्रधान मोदींसोबत मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, उप मुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य, खासदार हेमा मालिनींसह अनेक महिला आणि मंत्री उपस्थितीत असतील. अंदाजे दोस तास चालणाऱ्या या कार्यक्रमादरम्यान पंतप्रधान मोदी उत्तर प्रदेशात होत असलेल्या २०२ टेक होम रेशन प्लांटचे उद्घाटन करतील.

- Advertisement -

याशिवाय पंतप्रधान मोदी एक लाख बचत गटातील खात्यांमध्ये एक हजार कोटी रुपये ट्रान्सफर करतील. तसेच मुख्यमंत्री कन्या सुमंगला योजनाच्या एक लाख एक हजार लाभार्थींच्या खात्यांमध्ये २० कोटींहून अधिक पैसे मोदी ट्रान्सफर करतील. तसेच मोदींचा संगम पूजेचा कार्यक्रमही शक्य आहे. यासाठी तयारी केली गेली आहे. बम्हरौली विमानतळावरून पंतप्रधान मोदींचे विमान जवळपास पावणे तीन वाजता रवाना होईल.

काल, सोमवारी पंतप्रधान कार्यालयाकडून सांगण्यात आले की, तळागाळातील महिलांना सक्षम करण्यासाठी, महिलांचे आवश्यक कौशल्ये, संसाधने आणि प्रोत्साहन प्रदान करण्याच्या पंतप्रधान मोदींच्या दूरदृष्टीचा एक भाग म्हणून हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.

- Advertisement -

हेही वाचा – मतदान ओळखपत्र आता आधार कार्डशी लिंक होणार


 

Priyanka Shinde
Priyanka Shindehttps://www.mymahanagar.com/author/spriyanka/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सोशल मीडियावर काम करण्याची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -