घरट्रेंडिंगअबब! कोट्यवधी रुपयांचा हिरे जडित सोन्याचा टॉयलेट

अबब! कोट्यवधी रुपयांचा हिरे जडित सोन्याचा टॉयलेट

Subscribe

तुम्हाला जर विचारले की, तुमचा टॉयलेट सोन्याचा आहे का? तर तुम्ही कदाचित समोरच्याला हातात येईल ते मारुन फेकाल. मात्र, जरा थांबा! हे आता खरंच वास्तव्यात साकारलं गेलं आहे.

तुम्ही म्हणाल टॉयलेटचे कमोड हा काही चर्चा करण्याचा विषय नाही. मात्र थांबा! आज आम्ही तुम्हाला ज्या टॉयलेटची माहिती देणार आहोत त्या टॉयलेटमध्ये खास बात आहे. त्यामुळे संपूर्ण जगभरात या टॉयलेटची जबरदस्त चर्चा रंगली आहे. सोशल मीडियावर तर या टॉयलेटच्या एका व्हिडिओने प्रचंड धुमाकूळ घातला आहे. भारतात ग्रामीण भागांमध्ये असणारी टॉयलेटची मरामारी आणि गावकऱ्यांच्या मनात यासंदर्भात असणारे गैरसमज त्यामुळे समाजजागृती व्हावी यासाठी ‘टॉयलेट एक प्रेमकथा’ नावाचा चित्रपट चित्रपट निर्मात्यांना बनवावासा वाटतो.

ते जाऊद्या! तुम्हाला जर विचारले की, तुमचा टॉयलेट सोन्याचा आहे का? तर तुम्ही समोरच्याला हातात येईल ते मारुन फेकाल. मात्र, जरा थांबा! हे आता खरंच वास्तव्यात साकारलं गेलं आहे. चीनमध्ये सोन्याचा टॉयलेट बनवण्यात आला आहे आणि बात फक्त इथेच थांबत नाही तर या सोन्याच्या टॉयलेटच्या कमोडवर ४० हजारांपेक्षा जास्त हिरे जडित करण्यात आले आहेत. विशेष म्हणजे या टॉयलेटचं सीट बुलेट-प्रूफ तयार करण्यात आलं आहे. डेली मेलने दिलेल्या रिपोर्टनुसार, या ग्लॅमरस टॉयलेटचे सीट बुलेट-प्रूफ ग्लासने तयार करण्यात आले असून यात ४०,८१५ हीरे जडित करण्यात आले आहेत. या हिऱ्यांचे वजन मिळून ३३४.६८ कॅरेट आहे. सोनं आणि हिऱ्यांपासून तयार केलेल्या या टॉयलेटची किंमत १.३ मिलियन डॉलर म्हणजे जवळपास ९ कोटी रुपये इतकी आहे.

- Advertisement -

सोमवारी शांघाई येथे चायना इंटरनॅशनल इम्पोर्ट एक्सपो येथे हा टॉयलेट प्रदर्शनासाठी ठेवण्यात आला होता. हाँगकाँगच्या ज्वेलरी ब्रांड कोरेनेटने हा टॉयलेट बनवला आहे. दरम्यान, हा टॉयलेट खरेदी करण्यासाठी कुणी इच्छा व्यक्त केली की नाही? याबाबत ब्रांड कोरोनेटचे संस्थापक हारुन शुम यांनी सांगितलेलं नाही. मात्र, ते टॉयलेट विकण्याच्या मनस्थितीत नाहीत. ‘जास्तीत जास्त लोकांना हे टॉयलेट पाहता यावे यासाठी एक संग्राहालय असावे’, अशी इच्छा त्यांनी व्यक्त केली आहे. दरम्यान, सोशल मीडियावर सोन्याच्या या टॉयलेटवर भरपूर चर्चा होत आहे. अनेकांनी ही गोष्ट हास्यास्पद असल्याचे म्हटले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -