घरताज्या घडामोडीऑक्सिजन वाहून नेणार्‍या टँकरना राष्ट्रीय महामार्गावर टोल भरावा लागणार नाही

ऑक्सिजन वाहून नेणार्‍या टँकरना राष्ट्रीय महामार्गावर टोल भरावा लागणार नाही

Subscribe

देशातील राष्ट्रीय महामार्ग ओलांडून लिक्विड मेडिकल ऑक्सिजनची (एलएमओ) वाहतूक करणार्‍या टँकर आणि कंटेनरला टोल नाक्यांवर टोल न भरण्याची मुभा देण्यात आली आहे. म्हणजे कोणताही टोल भरावा लागणार नाही आहे. कोविड -१९ महामारीमुळे देशभरातील वैद्यकीय ऑक्सिजनची सध्याची अभूतपूर्व मागणी लक्षात घेता, लिक्विड मेडिकल रुग्णवाहिकांसारख्या अन्य आपात्कालीन वाहनांप्रमाणेच दोन महिने किंवा पुढील आदेशापर्यंत ऑक्सिजन असलेल्या कंटेनरला गणले जाईल.

फास्टटॅगच्या अंमलबजावणीनंतर टोल प्लाझा जवळ प्रतीक्षा काळ जवळपास संपुष्टात आला असला तरी भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने मेडिकल ऑक्सिजनच्या शीघ्र आणि सलग वाहतुकीसाठी अशा वाहनांना आधीच मार्गिका प्राधान्य दिले आहे. प्राधिकरणाने त्याच्या सर्व अधिकाऱ्यांना आणि इतर हितधारकांना महामारी विरोधात लढा देण्यासाठी सरकार आणि खासगी प्रयत्नांना कृतीशील मार्गाने मदत करण्याच्या सूचना देखील दिल्या आहेत.

- Advertisement -

कोविड -१९ च्या उद्रेकामुळे देशभर लिक्विड मेडिकल ऑक्सिजनची मोठी मागणी निर्माण झाली आहे. सध्या सुरू असलेल्या संकटाच्या वेळी, कोविड -१९ पासून गंभीररित्या बाधित रुग्णांचे प्राण वाचवण्यासाठी रुग्णालयांमध्ये आणि मेडिकल केंद्रांमध्ये लिक्विड मेडिकल ऑक्सिजन वेळेवर वितरित होणे महत्वाचे असते. टोल प्लाझावर वापरकर्ता शुल्क भरण्यात माफी मिळाल्याने राष्ट्रीय महामार्गांवर मेडिकल ऑक्सिजनची वेगवान वाहतूक सुनिश्चित होईल.


हेही वाचा – Corona Update : ऑक्सिजन एक्स्प्रेसद्वारे महाराष्ट्रासह अन्य राज्यांना ३४०० मेट्रिक टन ऑक्सिजनचा पुरवठा


- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -