CoronaVirus: दाक्षिणात्य अभिनेते मदतीसाठी पुढे; पण बॉलिवूड कुठेय?

करोनाच्या पार्श्वभूमीवर अनेक दाक्षिणात्य अभिनेते मदतीसाठी पुढे आले आहेत. मात्र, बॉलिवूड अभिनेते कुठे राहिले आहेत, असा प्रश्न उपस्थित राहिला आहे.

Tollywood actors give donations for helping coronavirus situation but bollywood actors still not giving help
दाक्षिणात्य अभिनेते मदतीसाठी पुढे; पण बॉलिवूड कुठेय?

जगभरात थैमान घालणाऱ्या करोना व्हायरसचा प्रसार थांबवण्यासाठी केंद्र सरकारने २१ दिवसांचे देशात लॉकडाऊन घोषित करण्यात आले आहे. सरकारच्या या निर्णयाचे अनेकांनी कौतुक देखील केले आहे. मात्र, या लॉकडाऊमुळे हातावर पोट असणाऱ्यांचे जगणे देखील कठीण होऊन बसले आहे. अशा गरजू लोकांसाठी अनेक जण वेगवेगळ्या पद्धतीने मदत करताना दिसत आहेत. यामध्ये अनेक सेलिब्रेटींचा समावेश देखील आहे. परंतु, आतापर्यंत अनेक दाक्षिणात्य अभिनेत्यांनी मदतीसाठी हात पुढे केला आहे. मात्र, बॉलिवूड अभिनेत्याकडून अद्याप मदतीचा हात पुढे आलेला नाही. त्यामुळे दाक्षिणात्य अभिनेते मदतीसाठी पुढे येतात पण बॉलिवूड अभिनेते कुठेय?, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

पवन कल्याण यांनी दिले १ कोटी

दाक्षिणात्य स्टार पवन कल्याण यांनी पंतप्रधान रिलीफ फंडाला १ कोटी रुपये दिले आहेत. याशिवाय आंध्र प्रदेश आणि तेलंगणा या दोन्ही राज्यांच्या रिलीफ फंडाला प्रत्येकी ५० लाख रुपयाची मदत केली असून त्यांनी याबाबत सोशल मीडियावर माहिती दिली आहे.

७० लाखाची मदत

दाक्षिणात्य सुपरस्टार राम चरणने तेलगू राज्य आणि केंद्राच्या रिलीफ फंडासाठी ७० लाख रुपये दिले आहेत.

एकाच कुटुंबातील तिघांनी केली मदत

दाक्षिणात्या सिनेसृष्टीतील अभिनेता शिवकुमार आणि त्यांची दोन्ही मुले सूर्या आणि कार्ती यांनी प्रत्येकी १० लाख रुपयांची दत केली आहे.

१० लाखाची मदत

तर अभिनेता विजय सेतुपति आणि अभिनेता शिवकार्किकेयनने १० लाखाची मदत केली आहे.

रजनीकांत यांनी केली ५० लाखांची मदत

एम्लॉइड फेडरेशन ऑफ साउथ इंडिया यूनियन वर्कर्सना रजनीकांत यांनी ५० लाखांची मदत केली आहे. सध्या लॉकडाऊन असल्यामुळे कामगार काम करु शकत नाही. त्यामुळे रजनीकांत यांनी आर्थिक मदत केली आहे..

घराचे करा हॉस्पिटल

अभिनेते कमल हसन यांनी देखील करोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर मदतीचा हात पुढे केला आहे. त्यांनी आपल्या घराचे हॉस्पिटलमध्ये रुपांतर करण्यास सांगितले आहे.

बॉलिवूड अभिनेत्याची मदत

बॉलिवूड अभिनेता हृतिक रोशनने करोना व्हायरस या महामारीशी लढण्यासाठी महाराष्ट्र सरकारला मदत केली आहे. त्याने २० लाख रुपयांची मदत सरकारला केली आहे. मात्र, अद्याप सामाजिक भान असलेला बॉलिवूड अभिनेता आमिर खान, सलमान खान, शाहरुख खान, अक्षय कुमार आणि अमिताभ बच्चन कुठे आहेत? असा प्रश्न उपस्थित होत आहे.


हेही वाचा – करोनाचा हृतीक रोशनला फायदा, मानले लॉकडाऊनचे आभार!