ऑस्कर विजेता अभिनेता टॉम हँक्ससह त्यांच्या पत्नीला ‘करोना’

ऑस्कर विजेता हॉलिवूड अभिनेता टॉम हँक्स आणि त्यांची पत्नी रिटा विल्सनला करोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे.

tom hanks announces that he wife rita wilson have coronavirus
ऑस्कर विजेता अभिनेता टॉम हँक्ससह त्यांच्या पत्नीला 'करोना'

ऑस्कर विजेता हॉलिवूड अभिनेता टॉम हँक्स आणि त्यांची पत्नी रिटा विल्सनला करोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे. याबाबत स्वत: अभिनेता टॉम हँक्सने ट्विटरच्या माध्यमातून माहिती दिली आहे. एका चित्रपटाच्या शूटिंगसाठी टॉम हँक्स आणि त्यांची पत्नी रिटा विल्सन ऑस्ट्रेलियाला गेले होते. त्यावेळी त्यांना करोनाची लक्षण दिसून आली होती. तसेच त्यांना ही करोनाची लागण ऑस्ट्रेलियात झाल्याची माहिती समोर आली आहे.