घरदेश-विदेशToolKit Case: दिशा रवीला जामीन नाही; न्यायालय २३ फेब्रुवारीला देणार निर्णय

ToolKit Case: दिशा रवीला जामीन नाही; न्यायालय २३ फेब्रुवारीला देणार निर्णय

Subscribe

टूलकिट प्रकरणी अटकेत असलेली पर्यवरण कार्यकर्ती दिशा रवी हिच्या जामीनाच्या याचिकेवर आज दिल्लीच्या पटियाला हाऊस न्यायालयात सुनावणी पार पडली. दोन्ही बाजू ऐकल्यानंतर न्यायालयाने दिशा रवीला जामीन न देता हा निकाल २३ फेब्रुवारीपर्यंत राखून ठेवला आहे. २२ वर्षाच्या दिशा रवीला न्यायालयाने न्यायालयीन कोठडी सुनावली होती. त्यानंतर दिशा रवीने जामीनासाठी शुक्रवारी याचिका दाखल केली होती.

दिशा रवीच्या याचिकेवर आज सुनावणी पार पडली. सुनावणी वेळी सरकारी वकीलांनी जामीन अर्जाचा विरोध केला. एम. ओ. धालीवालने सोशल मीडियावर खलिस्तानच्या समर्थनार्थ पेज बनवलं आहे. पोएटीक जस्टिस फाउंडेशनने शेतकरी आंदोलनाचा वापर करुन भारताची प्रतिमा डागाळण्याचा प्रयत्न केला, असं दिल्ली पोलिसांनी सांगितलं. तर दुसरीकडे दिशा रवीच्या वकीलांनी दिशाची बाजू मांडताना आपले विचार सोशल मीडियावर मांडणं हा गुन्हा नाही आहे, असं सांगितलं.

- Advertisement -

दिशा रवीच्या वकिलाने सांगितले की, टूलकिट आक्षेपार्ह आहे का हा प्रश्न आहे. कोणत्याही महत्वाच्या मुद्द्यांवर कोणाशीही बोलणे हा गुन्हा नाही. आम्ही कोणाशी बोलत आहोत, ते देशद्रोही आहेत, मग त्यांची शिक्षा मला का? पोलिसांच्या म्हणण्यानुसार सर्व काही बंगळुरुमध्ये झाले, तर तुम्ही ५ दिवसांच्या पोलीस रिमांडमध्ये एकदाही बंगळूरुमध्ये गेला नाहीत. कुठेही छापेमारी केली नाही. काहीही वसूल झाले नाही. दिशा रवीच्या वकिलाने सांगितलं की जेव्हा जेव्हा तपासणीसाठी आवश्यक असेल तेव्हा मी दिल्ली पोलिसांना पूर्ण सहकार्य करेन. चौकशी पूर्ण होईपर्यंत मी दिल्ली सोडणार नाही, यासाठी मी प्रतिज्ञापत्र देण्यासही तयार आहे. ते म्हणाले की २६ जानेवारी रोजी झालेल्या हिंसाचारात आतापर्यंत १४९ जण पकडले गेले आहेत मी कुणाशी बोललो आहे का?


हेही वाचा –  कार्यालयीन वेळांचं नियोजन करणं गरजेचं; नीती आयोगाच्या बैठकीत उद्धव ठाकरेंचा सल्ला

- Advertisement -

 

Girish Kamble
Girish Kamblehttps://www.mymahanagar.com/author/girishk/
गेल्या ३ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -