Homeदेश-विदेशTop-20 Billionaires : एचएमपीव्हीचा अंबानींसह अदानी यांनाही फटका, क्रमवारीत घसरण

Top-20 Billionaires : एचएमपीव्हीचा अंबानींसह अदानी यांनाही फटका, क्रमवारीत घसरण

Subscribe

भारतात एचएमपीव्ही दाखल झाल्याच्या वृत्ताचा परिणाम सोमवारी शेअर बाजारावर झाला. सेन्सेक्स 1,258.12 अंकांनी (1.59 टक्के) घसरून 77,964.99 अंकांवर बंद झाला. दिवसभरात त्याने 1,441.49 अंकांची घसरण नोंदवली होती.

(Top-20 Billionaires) नवी दिल्ली : अदानी समूहाचे अध्यक्ष गौतम अदानी आता जगातील टॉप-20 अब्जाधीशांच्या यादीतून बाहेर पडण्याच्या मार्गावर आहेत. एचएमपीव्हीच्या (HMPV) भीतीने सोमवारी शेअर बाजार कोसळल्यानंतर अदानी यांची एकूण संपत्ती 74.5 अब्ज डॉलर्सवर पोहोचली. परिणामी ब्लूमबर्ग बिलेनिअर इंडेक्समध्ये गौतम अदानी आता 19व्या स्थानावर आहे. त्यांच्यानंतर फ्रँकोइस बेटेनकोर्ट मेयर्स 20 व्या स्थानावर आहेत. त्यांची एकूण संपत्ती 74 अब्ज डॉलर्स आहे. (HMPV hits Adani’s and Ambanis’ wealth)

याच यादीत 17व्या क्रमांकावर रिलायन्स इंडस्ट्रीजचे मालक मुकेश अंबानी असून त्यांना एचएमपीव्हीमुळे 2.59 अब्ज डॉलर्सचा फटका बसला आहे. त्यांची संपत्ती आता 90.5 अब्ज डॉलर इतकी आहे. सोमवारी रिलायन्सचे शेअर्स 2.79 टक्क्यांनी घसरले होते. भारतातील सर्वात श्रीमंत महिला सावित्री जिंदाल यांची संपत्तीही 1.09 अब्ज डॉलर्सने घटून 31.7 अब्ज डॉलर झाली आहे.

हेही वाचा – Thackeray vs Mahayuti : तुमचा तो आव आता कुठे गेला? ठाकरे गटाचा भाजपाला सवाल

शेअर बाजारात मोठ्याप्रमाणात झालेल्या विक्रीच्या माऱ्यामुळे अदानी एनर्जी सोल्युशनचे शेअर 6 टक्क्यांपेक्षा जास्त घसरले. अदानी पॉवर 4.30 टक्क्यांनी तर अदानी ग्रीन 5.18 टक्क्यांनी घसरला. अदानी एंटरप्रायझेस, एसीसी, अंबुजा सिमेंट आणि अदानी पोर्ट्स प्रत्येकी 3पेक्षा जास्त टक्क्यांहून घसरले.

अदानी विल्मारही शेअर बाजारातील घसरणीचा फटका बसला. अदानी टोटल गॅसनेही जवळपास 3 टक्क्यांची घसरण नोंदवली. एनडीटीव्हीलाही 4 टक्क्यांहून अधिक फटका बसला आहे. यामुळे अध्यक्ष गौतम अदानी यांच्या निव्वळ संपत्तीवर परिणाम झाला आणि त्यांना एकाच दिवसात 3.53 अब्ज डॉलर्सचे नुकसान झाले.

शेअर बाजाराची घसरगुंडी

भारतात एचएमपीव्ही दाखल झाल्याच्या वृत्ताचा परिणाम सोमवारी शेअर बाजारावर झाला. सेन्सेक्स 1,258.12 अंकांनी (1.59 टक्के) घसरून 77,964.99 अंकांवर बंद झाला. दिवसभरात त्याने 1,441.49 अंकांची घसरण नोंदवली होती. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीही 388.70 अंकांच्या (1.62 टक्के) घसरणीसह 23,616.05 अंकांवर बंद झाला. निर्देशांकातील टाटा स्टील, एनटीपीसी, कोटक महिंद्रा बँक, इंडसइंड बँक, पॉवरग्रीड, झोमॅटो, अदानी पोर्ट्स, एशियन पेंट्स, महिंद्रा अँड महिंद्रा आणि रिलायन्स इंडस्ट्रीज यांना सर्वाधिक फटका बसला. (Top-20 Billionaires: HMPV hits Adani’s and Ambanis’ wealth)

हेही वाचा – HMPV in Nagpur : नागपुरातून महाराष्ट्रात HMPV चा शिरकाव, दोन लहानग्यांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह