घरताज्या घडामोडीहिजबुल टॉप कमांडर 'बशीर मीर'ची पाकिस्तानात हत्या, ISIच्या वादानंतर रावळपिंडीत गोळीबार

हिजबुल टॉप कमांडर ‘बशीर मीर’ची पाकिस्तानात हत्या, ISIच्या वादानंतर रावळपिंडीत गोळीबार

Subscribe

पाकिस्तानातील हिजबुल मुजाहिद्दीनचा टॉप कमांडर बशीर मीर उर्फ ​​इम्तियाज आलम याची इस्लामाबादच्या हद्दीत हत्या करण्यात आली आहे. पाकिस्तानी गुप्तहेर यंत्रणा ISIसोबत झालेल्या वादानंतर ISIनंच त्याचा काटा काढल्याचं सांगितलं जात आहे. रावळपिंडीमध्ये नमाज पढून मशिदीतून बाहेर पडल्यानंतर बशीरवर काही अज्ञात हल्लेखोरांकडून गोळीबार करण्यात आला. यावेळी त्याचा जागीच मृत्यू झाला.

इम्तियाज आलम उर्फ बशीर हा हिज्बुल मुजाहिदीनचा संस्थापक सदस्य होता आणि काश्मीरमध्ये दहशतवाद पसरवण्यात बशीर अहमदचा मोठा हात होता. यूएपीए अंतर्गत दहशतवादी म्हणून घोषित झाल्यानंतर त्यानं पाकिस्तानात आसरा घेतला होता. आलमचे मूळ गाव हे जम्मू काश्मीरच्या कुपवाडा जिल्ह्यातील बाबरपोरा आहे. परंतु आलम पाकिस्तानच्या रावळपिंडी येथे राहत होता.

- Advertisement -

काश्मीरमधील तरुणांना दहशतवादासाठी एकत्रित करण्यात आणि त्यांना शस्त्रास्त्रे आणि दारूगोळा पुरवण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. बशीर मीर पीओकेमधील दहशतवादी तळ आणि लॉन्च पॅड्सचे समन्वयन करत होता. गेल्या वर्षी मार्चमध्ये जैश-ए-मोहम्मदचा प्रमुख दहशतवादी जहूर मिस्त्री मारला गेला होता. आतापर्यंत जहूरच्या मारेकऱ्यांचा शोध लागलेला नाही.

बशीर मीर आणि जहूर मिस्त्री यांच्या हत्येमागे भारतीय गुप्तचर यंत्रणांचा हात असल्याचा दावा काही लोक करत आहेत. पाकिस्तान दीर्घकाळापासून भारतीय गुप्तचर संस्थांच्या रडारवर आहे. यापूर्वी पाकिस्ताननेच लाहोरमधील लष्कर-ए-तोयबाचा म्होरक्या हाफिज सईदच्या घराजवळ झालेल्या हल्ल्यासाठी भारतीय यंत्रणांना जबाबदार धरले होते.

- Advertisement -

मार्च २००७ साली पाकिस्तानी सेनेने आलमला ताब्यात घेतले होते. त्यावेळी त्याने उत्तर विभागाचे कमांडर मोहम्मद शफी दार यांना बळ देण्यासाठी १२ दहशतवाद्यांची टीम पाठवली होती. आयएसआयच्या इशाऱ्यानंतर त्याला सोडण्यात आले.


हेही वाचा : परकीय चलनाचा साठा संपला; पाकिस्तानवरील आर्थिक संकट आणखी गडद होणार


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -