Sunday, September 19, 2021
27 C
Mumbai
घर ताज्या घडामोडी Baramulla Encounter: जम्मू काश्मीरच्या सोपोरमध्ये LeTचा टॉप दहशतवादी मुदासिर पंडितसह तीन दहशतवाद्यांना...

Baramulla Encounter: जम्मू काश्मीरच्या सोपोरमध्ये LeTचा टॉप दहशतवादी मुदासिर पंडितसह तीन दहशतवाद्यांना कंठस्नान

जम्मू कास्मीरच्या सोपोरमध्ये जोरदार धुमश्चक्री, लष्कर-ए-तोयबाचा दहशतवादी मुदासिर पंडितचा खात्मा. भारतीय जवानांकडून परिसरात शोधमोहिम सुरू.

Related Story

- Advertisement -

जम्मू काश्मीरमध्ये दहशतवाद्यांविरोधात झालेल्या कारवाईत सुरक्षा दलाला काल, रविवारी मोठे यश मिळाले आहे. बारामूला जिल्ह्यातील सोपोर भागात रविवारी रात्री सुरक्षा दलात आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली. यामध्ये लष्कर-ए-तोयबाच्या तीन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला असून यात लष्करचा टॉप दहशतवादी मुदासिर पंडितचा समावेश आहे. दरम्यान आजूबाजूच्या परिसरात सध्या भारतीय सुरक्षा दलाची शोधमोहिम सुरू आहे.

- Advertisement -

आयजीपी काश्मीर विजय कुमार यांनी याबाबत माहिती देताना सांगितले की, मुदासिर पंडितला कंठस्नान घातल्यामुळे दहशतवादी संघटना लष्कर-ए-तोयबाचे खूप मोठे नुकसान झाले आहे. मुदासिर पंडित हा तीन पोलीस कर्मचारी, दोन सल्लागार आणि दोन नागरिकांची हत्या करण्यात सामील होता. या पंडितने सोपोरमध्ये झालेल्या सल्लागार बैठकीदरम्यान हल्ला केला आणि दोन सल्लागार, एका पोलीस कर्मचाऱ्याची हत्या केली. बऱ्याच काळापासून पोलीस त्याच्या शोधात होते.

रविवारी झालेल्या चकमक उत्तर काश्मीरमधील बारामूलच्या सोपोरमधील गुंड ब्राठ भागात झाली. रात्री उशीरा सुरक्षा दलाला परिसरात तीन दहशतवादी असल्याची माहिती मिळाली होती. या तीन दहशतवाद्यांमध्ये मोस्ट वाँटेड दहशतवादी मुदासिर पंडित देखील सामील असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यामुळे एसओजी, सैन्य आणि सीआरपीएफचे संयुक्त दल रात्री उशीरा गुंड ब्राठ भागात पोहोचले आणि दहशतवाद्यांना शोधण्यासाठी शोधमोहिम सुरू केली.

- Advertisement -

तिन्ही दहशतवादी एक दुकानाच्या मागे लपले होते. सुरक्षा दल आपल्या जवळ येत असल्याचे पाहून दहशतवाद्यांनी गोळीबार करण्यास सुरुवात केली. याला उत्तर देत असताना नेहमी प्रमाणाने सुरक्षा दलाने दहशतवाद्यांना आत्मसमर्पण करण्यासाठी सांगितले. परंतु दहशतवाद्यांनी याचे उत्तर गोळीबार स्वरुपात दिले. पण त्यानंतर सुमारे एक ते दोन वाजल्याच्या सुमारास तिन्ही दहशतवाद्यांना एका मागून एक ठार केले. या तिन्ही दहशतवाद्यांचा खात्मा केल्यानंतर आजूबाजूच्या परिसरात सुरक्षा दलाची शोधमोहिम सुरू आहे. दरम्यान तिन्ही दहशतवाद्यांचे मृतदेह ताब्यात घेतल्यानंतर यामध्ये मुदासिरचा समावेश आहे की नाही? याचा तपास केला गेला.

आयजीपीने आज, सोमवारी सकाळी ट्वीटरद्वारे तिन्ही दहशतवाद्यांमध्ये लष्कर-ए-तोयबाचा टॉप दहशतवादी मुदासिर पंडित सुद्धा असल्याची माहिती दिली. एवढेच नाहीतर ठार झालेल्यांमध्ये एक पाकिस्तानी दहशतवादी असरार ऊर्फ अब्दुल्लाचा समावेश आहे. पोलिसांच्या हिट लिस्टमध्ये हा देखील सामील होता. असरार २०१८ पासून उत्तरी काश्मीरमध्ये सक्रिय होता. दरम्यान तिसऱ्या दहशतवाद्यांची ओळख अजूनपर्यंत जाहीर केली नाही आहे. परंतु तो स्थानिक असल्याचे सांगितले जात आहे.

- Advertisement -