Most Powerful Passport : जगभरात कोणत्या देशाचा पासपोर्ट शक्तिशाली ? भारताचे स्थान काय ? यादी जाहीर

List of most powerful passports in the world released, where is India

जगभरात कोणत्या देशाचा पासपोर्ट सर्वाधिक शक्तिशाली आहे आणि कोणत्या देशातील पासपोर्ट सर्वात कमकुवत आहे, ही बाब स्पष्ट करणारी आकडेवारी २०२२ च्या सुरूवातीलाच समोर आली आहे. पासपोर्टच्या स्वतंत्रतेच्या निमित्ताने इंटरनॅशनल एअर ट्रान्सपोर्ट असोसिएशनने (ITA) ने मांडलेल्या आकडेवारीनुसार हेनले पासपोर्ट इंडेक्सने रॅंकिंगने जारी केली आहे. हेनले पासपोर्ट इंडेक्समध्ये भारत ८३ व्या स्थानावर आहे. याआधीच्या ऑक्सोबर २०२१ आकडेवारीपेक्षा भारताने सात अंकाचे वरचे स्थान मिळवले आहे. व्हिसाशिवाय प्रवास करण्यासाठी भारतीय प्रवाशांना ६० देशांसाठी मुभा आहे.

जपान आणि सिंगापुर सर्वोच्च स्थानी

यादीमध्ये जपान आणि सिंगापुरने पहिला क्रमांक मिळवला आहे. या देशाचे पासपोर्टधारक प्रवासी १९२ देशांमध्ये व्हिसा शिवायच प्रवास करू शकतात. जर्मनी आणि दक्षिण कोरियाचे पासपोर्ट पुन्हा एकदा दुसऱ्या स्थानी आहेत. या देशांचे प्रवासी व्हिसा शिवायच १९० देशांमध्ये प्रवास करू शकतात फिनलॅंड, इटली, लक्जमबर्ग आणि स्पेन हे देश संयुक्तपणे तिसऱ्या स्थानी आहेत. या देशाचे नागरिक व्हिसा शिवायच १८९ देशांचा प्रवास करू शकतात. फ्रांस, नेदरलॅंड, ऑस्ट्रिया आणि डेनमार्क हे देश चौथ्या स्थानावर आहेत. या देशातील प्रवासी १८८ देशांचा प्रवास हा व्हिसाशिवाय करू शकतात.

अमेरिका, ब्रिटन कोणत्या स्थानी ?

आर्यलंड आणि पोर्तुगाल हे पाचव्या स्थानी आहे. या देशातील प्रवासी १८७ देशांमध्ये व्हिसाशिवाय प्रवास करू शकतात. बेल्जियम, न्यूझीलंड, नॉर्वे, स्वित्झर्लंड, यूके आणि अमेरिका हे देश यादीमध्ये सहाव्या स्थानी आहेत. या देशातील नागरिक हे कोणत्याही व्हिसाशिवाय १८६ देशांचा प्रवास करू शकतात. ऑस्ट्रेलिया आणि कॅनडा या देशांसह ग्रीस, माल्टा आणि माल्टा हे देश सातव्या स्थानी आहेत. या देशातील लोक हे कोणत्याही व्हिसाशिवाय १८५ देशांमध्ये प्रवास करू शकतात.

नवव्या आणि दहाव्या स्थानी कोणते देश ?

हंगेरी आणि पोलंड या देशांनी तीन आकडे वर स्थान मिळवत आठवे स्थान यादीमध्ये मिळवले आहे. या देशातील प्रवासी १८४ देशांमध्ये प्रवास व्हिसाशिवाय करू शकतात. लिथुआनिया आणि स्लोवाकिया देशाचा पासपोर्ट नवव्या स्थानी आहे. याठिकाणी नागरिकांना कोणत्याही सूचनेशिवाय १८२ देशांचा प्रवास करण्याचा अधिकार आहे. एस्टोनिया, लातविया आणि स्लोवाकियाने शक्तीशाली पासपोर्टच्या यादीत दहावा स्थान मिळवला आहे. या देशातील पासपोर्ट असणाऱ्या व्यक्ती १८१ देशांचा प्रवास व्हिसाशिवाय करू शकतात.