घरCORONA UPDATEदेशात २४ तासात ४३,८९३ नवे कोरोना रूग्ण; बाधितांचा एकूण आकडा ८० लाखांच्या...

देशात २४ तासात ४३,८९३ नवे कोरोना रूग्ण; बाधितांचा एकूण आकडा ८० लाखांच्या उंबरठ्यावर!

Subscribe

देशात आतापर्यंत 72,59,509 जणांनी कोरोनावर मात केली आहे

देशात कोरोनाचा कहर कायम आहे. आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या मते, देशात एका दिवसात 43,893 नव्या कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली तर 508 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यामुळे देशातील एकूण कोरोना बाधितांची संख्या आता 79,90,322 झाली आहे. यामध्ये 6,10,803 रुग्णांवर कोरोनाचे उपचार सुरू आहेत.

दरम्यान आतापर्यंत 72,59,509 जणांनी कोरोनावर मात केली असून 1,20,010 रूग्णांचा मृत्यू झाला आहे. दिलासादायक बाब म्हणजे मागील 5 आठवड्यांपासून भारतातील कोरोनाची लागण होणाऱ्या रुग्ण संख्येत सरासरी दररोज नवीन रुग्णांची सातत्याने कमी होत आहेत.

- Advertisement -

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे सचिव राजेश भूषण म्हणाले की, “भारतात दहा लाख लोकसंख्येमध्ये 75,600 पेक्षा जास्त चाचण्या घेण्यात आल्या आहेत. मागील 5 आठवड्यांच्या सरासरीच्या आधारे, आतापर्यंत दिवसाला 11 लाख चाचण्या घेण्यात आल्या आहेत.

- Advertisement -

तर भारतात 10 लाख लोकसंख्येच्या 86 मृत्यूंची नोंद झाली आहे. भारतात दर दहा लाख लोकसंख्येमध्ये 5700 कोरोना बाधितांची नोंद करण्यात आली आहेत. आता बरे होणाऱ्यांची संख्या 72 लाखांपेक्षा जास्त झाली आहे. जे जगातील सर्वोच्च आहे. यासह देशात १० कोटीहून अधिक कोरोना चाचण्या केल्या गेल्या आहेत. सध्या देशाता रिकव्हरी रेट 90 टक्क्यांहून अधिक झाला असल्याचीही त्यांनी माहिती दिली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -