घरताज्या घडामोडीCOVID 19 tests: देशात आतापर्यंत २ कोटी २१ लाखाहून अधिक चाचण्या!

COVID 19 tests: देशात आतापर्यंत २ कोटी २१ लाखाहून अधिक चाचण्या!

Subscribe

देशभरात २४ तासांत ६ लाख ६४ हजार ९४९ जणांच्या कोरोना चाचण्या घेण्यात आल्या आहेत. तर देशात आतापर्यंत २ कोटी २१ लाख ४९ हजार ३५१ जणांच्या चाचण्या करण्यात आल्या आहेत.

जगभर पसरणाऱ्या कोरोनाबाधितांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे. देशात कोरोना विषाणूचा संसर्ग ज्या प्रमाणात पसरत आहे. त्या वेगाने आता रुग्णांच्या चाचण्यांमध्ये देखील वाढ होताना दिसत आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या ताज्या आकडेवारीनुसार; देशभरात २४ तासांत ६ लाख ६४ हजार ९४९ जणांच्या कोरोना चाचण्या घेण्यात आल्या आहेत. तर देशात आतापर्यंत २ कोटी २१ लाख ४९ हजार ३५१ जणांच्या चाचण्या करण्यात आल्या आहेत.

- Advertisement -

जगात १८ कोटीहून अधिक जण बाधित

जगात कोरोनाबाधितांचा आकडा सातत्याने वाढताना दिसत आहे. जगात आतापर्यंत कोरोनाबाधित आकड्यात सर्वात मोठी वाढ झाली असून सध्या १८ कोटी ९७ लाख ५ हजार २८० जण कोरोनाबाधित झाले आहेत. तर आतापर्यंत ७ लाख ११ हजार २२० जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तर आतापर्यंत जगात १२ कोटी १६ लाख ३ हजार ७५४ जणांनी कोरोनावर मात केली आहे. तर सध्या जगात ६ लाख १० हजार ३०६ जण Active आहेत. त्यामुळे एकीकडे कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ होत आहे. तर दुसरीकडे कोरोनावर मात देखील तेवढ्याच वेगाने केली जात आहे, अशी माहिती आरोग्य व कुटुंब मंत्रालयाने दिली आहे.


हेही वाचा – Gujarat Covid Hospital Fire : पंतप्रधानांनी केली मृतांच्या कुटुंबियांना २ लाखांची मदत जाहीर


- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -