घरताज्या घडामोडीCoronavirus: गोव्यात पर्यटकांना बंदी; गोवा सरकारचा निर्णय

Coronavirus: गोव्यात पर्यटकांना बंदी; गोवा सरकारचा निर्णय

Subscribe

करोनाचा संसर्ग थांबवण्यासाठी गोवा सरकारचा महत्त्वाचा निर्णय

करोनाच्या धास्तीने गोवा सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. गोव्याची अर्थव्यवस्था पर्यटनावर अवंलबून आहे. मात्र, गोवा सरकारने आपल्या अर्थव्यस्थेवर परिणाम होईल असा निर्णय घेतला आहे. करोनाचा संसर्ग होऊ नये म्हणून परदेशातील आणि परराज्यातील पर्यटकांना बंदी घालण्यात आली आहे. यासह गोव्यात पबवर बंदी घालण्यात आली आहे.

GOA GOVERNMENT

- Advertisement -

 

गोवा सरकारने करोनाची गंभीर दखल घेतली आहे. गोवा राज्य हे पर्यटनावर अवलंबून आहे. करोनाबाबत खबरदारी म्हणून पर्यटकांवर गोव्यात येण्यास बंदी घातली आहे. सर्वांनी घरी रहा, असे आवाहन देखील गोवा सरकारने केले आहे.

- Advertisement -

देशातही करोनाचा संसर्ग वेगाने पसरत आहे. देशात करोनाचे १६६ रुग्ण आहेत. तर ३ जणांचा करोनाने मृत्यू झाला आहे.

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -