Eco friendly bappa Competition
घर देश-विदेश Train Accident : मदुराईत ट्रेनच्या खासगी डब्याला आग, 10 जणांचा दुर्दैवी अंत

Train Accident : मदुराईत ट्रेनच्या खासगी डब्याला आग, 10 जणांचा दुर्दैवी अंत

Subscribe

लखनऊवरून रामेश्वरला जाणाऱ्या एक्सप्रेसला आग लागल्याची भीषण घटना घडली आहे. तमिळनाडूतील मदुराई रेल्वेवर घडलेल्या या घटनेत 10 लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. या ट्रेनमधून गॅस सिलिंडरची तस्करी करण्यात येत होती आणि ज्यामुळे ही आगीची घटना घडल्याचे सांगण्यात येत आहे.

तमिळनाडू : लखनऊवरून रामेश्वरला जाणाऱ्या एक्सप्रेसला आग लागल्याची भीषण घटना घडली आहे. तमिळनाडूतील मदुराई रेल्वेवर घडलेल्या या घटनेत 10 लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. या ट्रेनमधून गॅस सिलिंडरची तस्करी करण्यात येत होती आणि ज्यामुळे ही आगीची घटना घडल्याचे सांगण्यात येत आहे. धक्कादायक बाब म्हणजे आग लागली त्यावेळी या डब्यामध्ये 65 प्रवासी होते. आज शनिवारी (ता. 26 ऑगस्ट) सकाळी 5 वाजून 15 मिनिटाला ही घटना घडली. ज्यानंतर प्रवाशांची एकच धांदल उडाली. (Train Accident: 10 people died in a fire in a private coach of a train in Madurai)

हेही वाचा – Adani- Hindenburg Case: सेबीने सर्वोच्च न्यायालयात सादर केला अहवाल, ‘या’ दिवशी होणार सुनावणी

- Advertisement -

मिळालेल्या माहितीनुसार, तमिळनाडूमधील मदुराई रेल्वे स्थानकावर शनिवारी पहाटे उभ्या असलेल्या लखनऊ-रामेश्वर या ट्रेनच्या डब्यात आग लागून 10 प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. डब्यातू बेकायदेशीरपणे ‘गॅस सिलेंडर’ नेण्यात येत होते, ज्यामुळे हा अपघात झाल्याचे दक्षिण रेल्वेकडून सांगण्यात आले आहे. ज्या डब्यात आग लागली तो ‘खाजगी पार्टी कोच’ होता (संपूर्ण कोच एका व्यक्तीने बुक केला होता) आणि त्यातील 65 प्रवासी उत्तर प्रदेशातील लखनौहून मदुराईला पोहोचले होते. रेल्वे प्रशासनाने सांगितल्याप्रमाणे आग विझवण्याच्या प्रयत्नात गुंतलेल्या रेल्वे कर्मचाऱ्यांव्यतिरिक्त पोलीस, अग्निशमन दल आणि बचाव दलाच्या जवानांनी डब्यातून मृतदेह बाहेर काढले.

रेल्वे प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, हा एक खाजगी पक्षाचा डबा होता, जो काल (25 ऑगस्ट) नागरकोइल जंक्शन येथे ट्रेन क्रमांक 16730 (पुनालुर-मदुराई एक्स्प्रेस) शी जोडला गेला होता. डबा वेगळा करून मदुराई रेल्वे स्थानकावर उभा करण्यात आला. या डब्यात प्रवाशांनी बेकायदेशीरपणे गॅस सिलिंडर आणले होते आणि त्यामुळेच आग लागली.

- Advertisement -

समाजवादी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी या घटनेसाठी रेल्वेला जबाबदार धरले आहे. त्यांच्या निष्काळजीपणामुळे ही घटना घडल्याचे त्यांच्याकडून सांगण्यात आले आहे. तर त्यांनी या प्रकरणाच्या चौकशीची मागणी करत मृतांच्या कुटुंबीयांना 1-1 कोटींची भरपाई देण्याचे सांगितले आहे. अखिलेश यादव यांनी या घटनेबाबतचे ट्वीट करत म्हटले आहे की, “रेल्वेच्या निष्काळजीपणामुळे मदुराई येथे झालेल्या रेल्वे अपघातात उत्तर प्रदेशातील 10 जणांचा मृत्यू झाल्याची बातमी अत्यंत दुःखद आहे. श्रद्धांजली! या निष्काळजीपणाची सखोल चौकशी झाली पाहिजे. आणि मृतांच्या कुटुंबीयांना शिक्षा झाली पाहिजे.” 1-1 कोटी नुकसान भरपाई म्हणून देण्यात यावे.”

- Advertisment -