(Train Accident Averted) पुणे : लोको पायलटच्या सतर्कतेमुळे सिकंदराबाद-पुणे एक्स्प्रेस गाडीचा अपघात घडवून आणण्याचा प्रयत्न निष्फळ ठरला. रविवारी रात्री 10:45 वाजण्याच्या सुमारास सिकंदराबाद-पुणे एक्स्प्रेस ट्रेनच्या लोको-पायलटला पुण्यातील उरुळी कांचनजवळ ट्रॅक बदलताना समजाकंटकांनी रुळावर गॅस सिलिंडर ठेवल्याचे आढळले. लोको-पायलटने तत्काळ इमर्जन्सी ब्रेक लावल्याने सुदैवाने पुढचा अनर्थ टळला. (Secunderabad Pune Express accident was averted due to alert loco-pilot)
या घटनेबाबत उरुळी पोलिसांनी सोमवारी अज्ञात व्यक्तींविरुद्ध रेल्वेरुळाचे नुकसान करणे किंवा रेल्वेप्रवास असुरक्षित बनविण्याच्या उद्देशाने केलेल्या गैरवर्तनाचा गुन्हा दाखल केला आहे. तेथून ट्रेन जाण्याच्या काही मिनिटेआधी हे सिलिंडर जाणूनबुजून रेल्वेरुळावर ठेवले असावे, असा पोलिसांचा अंदाज आहे.
#Maharashtra | Major Train Accident Averted in Pune
The driver of Pune-Secunderabad Express applied emergency brakes after spotting an LPG cylinder placed on the tracks at Uruli Kanchan. Police suspect it was a deliberate attempt to cause a disaster. A case has been registered… pic.twitter.com/g1zKfrBQma
— Organiser Weekly (@eOrganiser) December 31, 2024
लोको पायलट आर. टी. वाणी यांना रुळावर गॅस सिलिंडर दिसताच इमेर्जन्सी ब्रेकचा वापर करून गाडी थांबवली. त्यानंतर ट्रेन मॅनेजर केतन रत्नानी यांच्यासह आर. टी. वाणी यांनी स्टेशन मास्टरला घटनेची माहिती दिली. यानंतर रेल्वे प्रोटेक्शन फोर्स (आरपीएफ), रेल्वे पोलीस (जीआरपी) आणि स्थानिक पोलीस घटनास्थळी पोहोचले. याप्रकरणी आरपीएफ कर्मचारी शरद वाळके (38) यांनी सोमवारी पोलिसांत तक्रार दाखल केली.
ट्रेन आणि प्रवाशांना हानी पोहोचवण्याचा हेतू रुळावर हे सिलिंडर ठेवणाऱ्या व्यक्तीचा होता, असा आम्हाला संशय आहे. सिलिंडर पूर्णपणे गॅसने भरला होता. सिलिंडर आणणाऱ्या व्यक्तीपर्यंत पोहोचण्याचा आमचा प्रयत्न असून त्यासाठीच सिलिंडर नक्की कोणाचे होते आणि कुठून आणण्यात आले, यादृष्टीने आम्ही तपास सुरू केला आहे, असे उरुळी कांचनचे पोलीस निरीक्षक शंकर पाटील म्हणाले. पोलीस या प्रकरणाचा गांभीर्याने तपास करत असून स्थानिक नागरिकांचीही चौकशी केली जात आहे. (Train Accident Averted: Secunderabad Pune Express accident was averted due to alert loco-pilot)
हेही वाचा – Nitesh Rane Controversy : नितेश राणेंच्या त्या वक्तव्यावरून केरळचे मुख्यमंत्री संतापले, म्हणाले…