घरCORONA UPDATE२१ मेपासून ट्रेनची ऑनलाईन बुकिंग सुरू, लॉकडाऊननंतर पहिली प्रवासी ट्रेन १ जूनला...

२१ मेपासून ट्रेनची ऑनलाईन बुकिंग सुरू, लॉकडाऊननंतर पहिली प्रवासी ट्रेन १ जूनला धावणार!

Subscribe

गेल्या दोन महिन्यांपासून देशभरात लॉकडाऊन लागू आहे. या पार्श्वभूमीवर बंद असणारी रेल्वेची प्रवासी वाहतूक अखेर १ जूनपासून सुरू होणार असल्याची घोषणा मंगळवारी रेल्वेमंत्री पियुष गोयल यांनी केली होती. मात्र, सुरुवातीला दिवसाला फक्च २०० ट्रेनच धावणार असल्याचं स्पष्ट करण्यात आलं आहे. या ट्रेनसाठी बुकिंग कधीपासून सुरू होणार याविषयी तेव्हा सांगण्यात आलं नव्हतं. मात्र, आता ते जाहीर झालं असून २१ मे अर्थात गुरुवारी सकाळी १० वाजेपासून ऑनलाईन पद्धतीने या ट्रेनसाठी बुकिंग सुरू होईल, असं केंद्र सरकारकडून जाहीर करण्यात आलं आहे. यामध्ये केंद्र सरकारने या ट्रेन कोणत्या असतील आणि कोणत्या मार्गावरून धावतील, याची यादीच जाहीर केली आहे.

- Advertisement -

दरम्यान, या कोणत्या २०० ट्रेन असतील, त्याची यादी देखील जाहीर करण्यात आली आहे.

train list

- Advertisement -

train list 1

याव्यतिरिक्त सध्या सुरू असलेल्या श्रमिक ट्रेन देखील अशाच सुरू राहतील, असं देखील स्पष्ट करण्यात आलं आहे. सध्या रोज २०० श्रमिक ट्रेन सुरू असून त्यामध्ये देखील लवकरच वाढ करण्यात येणार असल्याचं रेल्वेमंत्र्यांनी ट्वीटरवर जाहीर केलं आहे.

विमान वाहतूकही २५ मेपासून सुरू!

दरम्यान, रेल्वेनंतर नागरी उड्डाण मंत्रालयाने देखील विमान वाहतूक सुरू करण्याची घोषणा केली आहे. येत्या २५ मे पासून देशांतर्गत विमान वाहतूक सुरू करण्यात येणार आहे. त्यासंदर्भात सर्व विमान कंपन्यांना सूचित करण्यात आलं आहे. त्यासोबतच, विमानातून प्रवास करताना कोणती काळजी घेणं गरजेचं आहे, याच्या सूचना देखील देण्यात आल्या असून सोशल डिस्टन्सिंग आणि कोरोनासंदर्भातल्या इतर उपाययोजनांचा अवलंब करूनच विमानातून प्रवासी वाहतूक करता येणार आहे. शिवाय, त्या त्या राज्य सरकारांची परवानगी घेऊनच ही विमानवाहतूक सुरू केली जाणार असल्याचं देखील स्पष्ट करण्यात आलं आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -