घरदेश-विदेशIndian Traitor : आपलाच माणूस निघाला गद्दार, परराष्ट्र मंत्रालयाच्या अधिकाऱ्याने केला मोठा...

Indian Traitor : आपलाच माणूस निघाला गद्दार, परराष्ट्र मंत्रालयाच्या अधिकाऱ्याने केला मोठा गुन्हा

Subscribe

नवी दिल्ली : आजवर भारतासोबत अनेकांनी गद्दारी केल्याची अनेक उदाहरणे समोर आलेली आहेत. पण तपासाच्या अंती त्याची वेगळीच कारणे समोर आलेली आहेत. परंतु, आता आपल्याच देशातील महत्त्वाच्या पदावर असलेल्या एका व्यक्तीने देशाचा घात केल्याची घटना उघडकीस आली आहे. रशियाच्या परराष्ट्र मंत्रालयात कार्यरत असलेल्या एका अधिकाऱ्याने पाकिस्तानी आयएसआयएसला भारतीय सैन्याची गोपनिय कागदपत्रे पुरवल्यची धक्कादायक माहिती समोर आली आहे. देशासोबत गद्दारी करणाऱ्या या अधिकाऱ्याचे नाव सतेंद्र सिवाल असे असून तो उत्तर प्रदेशच्या हापुड जिल्ह्यातील राहणारा असल्याचे सांगण्यात आले आहे. (Treason against India by Indian embassy official in Russia)

हेही वाचा… Female Judge Suicide : महिला न्यायाधीशाने सुसाईड नोट लिहून केली आत्महत्या; काँग्रेसचा योगी सरकारवर निशाणा

- Advertisement -

मिळालेल्या माहितीनुसार, दहशतवाद्यांच्या मागावर असलेल्या उत्तर प्रदेशच्या एटीएस पथकाला लष्कराचे गोपनिय कागदपत्र पाकिस्तानला पुरविले जात असल्याचा माहिती मिळाली होती. पाकिस्तानची गुप्तचर संस्था असलेल्या आयएसआयच्या एजंट्सनी काही व्यक्तींद्वारे भारत सरकारच्या परराष्ट्र मंत्रालयातील काही अधिकाऱ्यांना पैशांचे आमिष दाखवले होते आणि त्यातील काही अधिकारी आपल्या बाजुने केल्याचे तपासात समोर आले होते. तर महत्त्वाची बाब म्हणजे आयएसआयएसला अशी माहिती पुरविण्यात आली होती, ज्या माहितीमुळे शाच्या अंतर्गत आणि सीमेवरील सुरक्षेला धोका निर्माण झाला असता. ज्यानंतर तांत्रिक बाबींची चौकशी केल्यावर हा अधिकारी सतेंद्र असल्याचे समोर आले.

सतेंद्र सिवाल हा अधिकारी आयएसआय हँडलर्सच्या नेटवर्कमध्ये सामील होऊन भारतविरोधी कारवायांमध्ये सहभागी असल्याचे एटीएसच्या हाती लागले होते. तर, सतेंद्र हा भारतीय दूतावास, संरक्षण मंत्रालय आणि परराष्ट्र मंत्रालयासह भारतीय लष्करी आस्थापनांच्या धोरणात्मक हालचालींबाबत महत्त्वाची गोपनीय माहिती आयएसआयला पाठवत होता. ही माहिती उघडकीस आल्यानंतर त्याला मेरठला बोलावून चौकशी केली असता तो एटीएसच्या एकाही प्रश्नाचे समाधानकारक उत्तर देऊ शकला नाही. तर त्यानेही आपल्या गुन्ह्याची कबुली दिली. त्यानंतर सतेंद्रला तत्काळ अटक करण्यात आली. धक्कादायक बाब म्हणजे भारत सरकारने सतेंद्र नावाच्या या अधिकाऱ्याची भारतीय संरक्षण क्षेत्रातील सर्वात महत्वाचा साथीदार असलेल्या रशियामध्ये नियुक्ती केली होती, अशी माहिती देखील समोर आली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -