घरताज्या घडामोडीकोर्टाचा वेळ वाया घालवण्यापेक्षा कोरोनाग्रस्तांवर उपचार करा, रामदेव बाबांविरोधी याचिकेवर कोर्टाने IMA...

कोर्टाचा वेळ वाया घालवण्यापेक्षा कोरोनाग्रस्तांवर उपचार करा, रामदेव बाबांविरोधी याचिकेवर कोर्टाने IMA ला सुनावले

Subscribe

या प्रकरणाची पुढील सुनावणी १३ जुलै रोजी होणार

अँलोपँथीविरोधात बाबा रामदेव यांनी केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याविरोधात दिल्ली मेडिकल असोसिएशनने दिल्ली उच्च न्यायलयात दाखल केलेल्या खटल्यावर आज सुनावणी करण्यात आली. त्यावेळी दिल्ली उच्च न्यायालयाने मेडिकल असोसिएशनच्या डॉक्टरांना चांगलेच सुनावले आहे. न्यायमूर्ती सी हरीशंकर यांच्या खंडपीठाने IMAला अंतरिम दिलासा देण्यास नकार देताना असे सुनावले की, कोर्टाचा वेळ वाया घालवण्यापेक्षा कोरोना साथीच्या आजारावरील उपचारांवर घालवा. त्याचप्रमाणे खंडपीठाने असे देखील म्हटले आहे की, अशा परिस्थितीत रामदेव बाबा यांची बाजू ऐकून घेतल्याशिवाय अंतिम दिलासा देता येणार नाही. तसेच खंडपीठाने रामदेव बाबा,ट्विटर, फेसबुक आणि आस्था वाहिलीला समन्स बजावून त्यांना तीन आठवड्यात जाब विचारला आहे. या प्रकरणाची पुढील सुनावणी १३ जुलै रोजी होणार आहे. (Treat corona patients instead of wasting court time, court Slam IMA on petition against Ramdev Baba)

तांत्रिक बाबींविषयी बोलताना कोर्टाने असे म्हटले आहे की, उद्या मला असे वाटेल की होमिओपॅथी बनावट आहे. हे माझे एक मत आहे. त्याच्याविरोधात गुन्हा कसा दाखल होऊ शकतो? त्याचप्रमाणे कोर्टाने पुढे असेही म्हटले आहे की, जरी आपण असे मानले की ते जे काही बोलत आहेत ते चुकीचे किंवा लोकांची दिशाभूल करणारे आहे, तरीही लोकहितार्थ असा दावा करता येणार नाही. यासाठी जनहित याचिका असायला हवी होती.

- Advertisement -

IMAचे वरिष्ठ वकील राजीव दत्ता यांनी असे म्हटले आहे की, रामदेव यांच्या टीकेमुळे IMAच्या सदस्यांवर परिणाम होत आहे. कोरोनिल हा कोरोनावर उपाय नसून डॉक्टरांच्या अधिकाराचा मुद्दा आहे. त्यावर खंडपीठाने कोरोनिल हा एक इलाज आहे की नाही हे न्यायालय ठरवू शकत नाही ते काम वैद्यकीय तज्ज्ञांनी करावे. राजीव दत्ता यांनी पुढे असे म्हटले आहे की, रामदेव सतत अँलोपॅथीला बनावट म्हणत आहे आणि कोरोनाचा उपचार म्हणून कोरोनिलचा खोटा प्रचार करित आहेत. सरकारने देखील रामदेव यांना कोरोनिलची जाहिरात न करण्यास सांगितले होते मात्र त्यांनी ती २५० कोटींना विकली.


हेही वाचा – Long COVID: कोरोना रिकव्हरीनंतर बर्‍याच दिवसांपर्यंत दिसतात ‘ही’ ३ लक्षणे

- Advertisement -

 

Minal Gurav
Minal Guravhttps://www.mymahanagar.com/author/minal/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रीय. मनोरंजन,लाईफ स्टाईल विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -