घरताज्या घडामोडीशिवसेनेचे बंडखोर आमदार थांबलेल्या हॉटेलवर तृणमूल काँग्रेसचा हल्लाबोल

शिवसेनेचे बंडखोर आमदार थांबलेल्या हॉटेलवर तृणमूल काँग्रेसचा हल्लाबोल

Subscribe

शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर महाराष्ट्रातील राजकारणाला एक वेगळंच वळण लागलं आहे. शिंदे गटातील शिवसेना आमदारांचा मुक्काम असलेल्या गुवाहाटी येथील रॅडिसन ब्लू हॉटेलवर तृणमूल काँग्रेसच्या स्थानिक कार्यकर्त्यांनी हल्लाबोल केला आहे. गुवाहाटीमध्ये ज्या ठिकाणी शिंदे समर्थक आमदार आहेत. त्या रेडिसन ब्लू हॉटेलबाहेर तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी जोरदार आंदोलन केलं. पोलिसांनी काही लोकांना ताब्यात घेतलं असून पोलीस बंदोबस्तात वाढ करण्यात आली आहे. आज सकाळी तृणमूल काँग्रेसचे कार्यकर्ते अचानक या हॉटेलच्या परिसरात धडकले.

तृणमूलच्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत रॅडिसन हॉटेलमध्ये शिरण्याचा प्रयत्न केला. मात्र, याठिकाणी एकनाथ शिंदे आणि शिवसेनेचे बंडखोर आमदार थांबल्याने याठिकाणी आसाम पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त आहे. त्यामुळे त्यांना हॉटेलमध्ये घुसता आले नाही. मात्र, या घटनेमुळे आता राष्ट्रीय स्तरावरील मित्रपक्ष शिवसेनेच्या मदतीला धावून आले आहेत.

- Advertisement -

दोन दिवसांपूर्वी एकनाथ शिंदे गटाच्या बंडखोरांना सूरतमधून हवाईमार्गे गुवाहाटीत आणण्यात आल होते. गुवाहाटीच्या रॅडिसन ब्लू हॉटेलमध्ये या सगळ्यांना ठेवण्यात आले आहे. आसामचे मुख्यमंत्री हेमंत बिस्वा सरमा आणि भाजपच्या कार्यकर्त्यांकडून शिवसेनेच्या या बंडखोर आमदारांची सरबराई केली जात आहे. शिवसेनेतील बंडखोर आमदार निश्चिंत होते. मात्र, आज सकाळी तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी हॉटेलवर अचानक हल्लाबोल करत सर्वांनाच अचानक धक्का दिला आहे.

- Advertisement -

भाजपने महाराष्ट्रातील राजकारण आसाममध्ये खेळू नये. भाजपने शिवसेनेच्या आमदारांची खरेदी-विक्री करण्यासाठी त्यांना याठिकाणी आणून ठेवले आहे. आसामच्या अनेक भागांमध्ये सध्या पूरस्थिती निर्माण झाली आहे. या पूरात अनेक लोकांचा मृत्यू झाला आहे. मात्र, याकडे केंद्र सरकराने दुर्लक्ष केलं आहे. त्यामुळे शिवसेना आमदारांना आसाममध्ये आणल्यानंतर घोडेबाजार सुरू केला आहे, अशी टीका तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केली आहे.


हेही वाचा : मुख्यमंत्र्यांनी अजय चौधरींची नेमणूक केलीय, ते पत्र मी स्वीकारलंय – उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ


 

mayur sawant
mayur sawanthttps://www.mymahanagar.com/author/mayursawant/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. राजकीय, क्रीडा विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -